Agriculture news in marathi Accelerate summer soybean cultivation | Page 2 ||| Agrowon

उन्हाळी सोयाबीन लागवडीस गती

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जानेवारी 2021

 आगामी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शेतकरी उन्हाळी सोयाबीन लागवडीस प्राधान्य देऊ लागले आहेत. महाबीजने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ३०० हेक्टरवर अशा प्रकारच्या लागवडीचे नियोजन  आहे.

अकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे मालाचा दर्जा घसरला. अनेकांना उत्पादनही पुरेसे झालेले नाही. बीजोत्पादन कार्यक्रमालाही फटका बसला. त्यामुळे आगामी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शेतकरी उन्हाळी सोयाबीन लागवडीस प्राधान्य देऊ लागले आहेत. महाबीजने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ३०० हेक्टरवर अशा प्रकारच्या लागवडीचे नियोजन केले आहे. या साठी बियाणे वितरित केले जात आहे.

गेल्या खरीप हंगामात पीक काढणीच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. परिणामी सोयाबीनसारखे पीक काळवंडले. अनेकांना तर एकरी क्विंटल, दोन क्विंटल उत्पादन झाले. कंपन्यांच्या बीजोत्पादन कार्यक्रमावरही परिणाम झालेला आहे. यामुळे यंदा वाशीमसारख्या बाजारात उत्कृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाण्यासाठी सातत्याने वाढीव दराने विकल्या जात आहे. अनेक कंपन्यांनी बाजारातील सोयाबीन खरेदी वाढवलेली आहे. कृषी यंत्रणा शेतकऱ्यांना घरचे बियाणे साठवून ठेवण्याचे सातत्याने आवाहन करीत आहे.

दुसरीकडे आता उन्हाळ्यात सोयाबीन लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. महाबीजने अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचे ३०० हेक्टरचे क्षेत्र निश्‍चित केले आहे. जेएस ३३५ व ९३०५ या सुधारित वाणांचे पायाभूत बियाणे बीजोत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. 
सध्या या विभागात प्रत्येक तालुक्यात अशा लागवडीसाठी शेतकऱ्यांना समाज माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. लागवडीनंतर महाबीजचे तंत्रज्ञ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतांना भेटी देऊन मार्गदर्शनही करणार आहेत.

मुगाचीही लागवड
महाबीजने १०० हेक्टरवर उन्हाळी मुगाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. या वर्षात जिल्ह्यात मुगाचे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे बियाणे निर्माण करण्याच्या उद्देशाने मुगाचे बीजोत्पादन केले जाणार आहे. 

प्रतिक्रिया

उन्हाळ्यात बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. या बाबत कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने कृती कार्यक्रम निश्‍चित केलेला आहे. उन्हाळयात लागवड होत असल्याने पुढील हंगामासाठी चांगल्या उगवण क्षमतेचे बियाणे तयार होईल. या दृष्टीने महाबीजने ३०० हेक्टरवर सोयाबीन आणि १०० हेक्टरवर मूग पिकाचे नियोजन केले आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
-जगदीशसिंग खोकड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, अकोला


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या दरात...सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात...
औरंगाबादमध्ये कैरी खातेय भाव;...औरंगाबाद : आठवडाभरात जवळपास चार वेळा आवक झालेली...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत सुधारणा;...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
कोल्हापूरच्या उन्हाळी नाचणी प्रयोगाचे...कोल्हापूर/नगर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा...
केंद्र सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर...नागपूर : शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांना देखील...
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर कांदा...नगर ः पाण्याची उपलब्धता असल्याने नगर जिल्ह्यात...
रुंद सरी वरंबा पद्धतीबाबत...जळगाव ः सुसरी (ता. भुसावळ) येथे नुकतेच जळगाव...
औरंगाबादेत बटाटा सरासरी ८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हरभरा विक्रीसाठी ३७८३ शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी/हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (...
‘बॉयोमिक्‍स’मुळे विद्यापीठास वेगळी ओळख...परभणी ः वनस्पती रोगशास्त्र विभागातर्फे निर्मित...
केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे...गडचिरोली : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे...
पावसाळ्यातील भरपाईसाठी गावकरी करणार...भंडारा : तुमसर तालुक्‍यातील वैनगंगा, बावनथडी...
कोल्हापूरसाठी पाच फिरते पशुवैद्यकीय...कोल्हापूर : फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पाच...
वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामामुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना...
स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी ...मुंबई : कॉँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय...
‘चामोली’ आपत्तीचा अन्वयार्थबर्फ वितळल्यानंतर उघडा पडलेला मातीचा भाग शेती,...
कृषी सल्ला : भुईमूग, हरभरा, मका, खोडवा...हरभरा पीक सर्वसाधारणपणे ११० ते १२० दिवसांमध्ये...
गहू कापणी, साठवणीचे नियोजनगेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून...
पुण्यात काकडी, फ्लॉवरच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...