Agriculture news in Marathi Accelerate the work of building Currant in Nashik | Agrowon

नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या कामाला वेग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील क्षेत्रापैकी ३० टक्के द्राक्षबागांमधील काढण्या बाकी आहेत. यात प्रामुख्याने निर्यातक्षम मालासाठी उठाव नसल्याने त्यास अपेक्षित दरही नाही. त्यामुळे माल खराब होत असल्याने बेदाणा निर्मितीच्या कामांना वेग आला आहे. 

नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील क्षेत्रापैकी ३० टक्के द्राक्षबागांमधील काढण्या बाकी आहेत. यात प्रामुख्याने निर्यातक्षम मालासाठी उठाव नसल्याने त्यास अपेक्षित दरही नाही. त्यामुळे माल खराब होत असल्याने बेदाणा निर्मितीच्या कामांना वेग आला आहे. 

द्राक्ष काढणीसाठी निर्यातदार व व्यापाऱ्यांशी व्यवहार करून ठेवले होते. मात्र, ‘कोरोना’मुळे प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या. निर्यात प्रक्रिया काही काळ बंद झाली तर शीतगृहे ही बंद होती. पॅक हाऊसमध्येही मजुरांनाही एकत्रित काम करण्यास बंदी लादली गेली. यामुळे द्राक्ष हंगाम अडचणीतून जायला सुरुवात झाल्याने काढणी मंदावली. त्याचा परिणाम असा की, तयार माल अतिपक्व होऊन वेलींवरच राहिला आहे. त्यामुळे पुढील हंगामाचे नियोजन करण्यासाठी माल काढून खरड छाटणीच्या तयारीसाठी शेतकरी बेदाणा उत्पादन घेत आहेत. 

निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये नैसर्गिक पद्धतीने वाळवून किंवा रसायने वापरून बेदाणे बनविताना पाहायला मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला द्राक्ष उत्पादकांना अवकाळीच्या फटक्याला सामोरे जावे लागले. तर आता अधिक उत्पादन खर्च करूनही ५ ते १५ रुपयांपर्यंत प्रतिकिलोप्रमाणे दर मिळतो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. 

आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असताना व्यापारी, मजूरटंचाई असल्याने द्राक्ष उत्पादकांना बेदाणा निर्मितीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. देशभरात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने पुरवठा व विक्री अडचणीत सापडली आहे.

यावर्षी झालेला एकरी खर्च तीन लाख रुपये खर्च करून छाटणी ते माल तयार होईपर्यंत एक प्लॉट फेल गेला. त्यामुळे मोठी मेहनत करून व्यापारी येत नसल्याने नुकसान सोसून बेदाणा करण्याचा निर्णय घेतला. 
- शांताराम अडसरे, द्राक्ष उत्पादक, करंजी खुर्द, ता. निफाड 

नैसर्गिक अडचणीत सुद्धा उत्पादन खर्च करून निर्यातक्षम माल तयार केला. त्यात व्यापारी येत नाही, निर्यातदारांकडून उठाव नसल्याने दर नाही. त्यामुळे एवढ्या मालाचे करायचे काय? यावर पर्याय म्हणून द्राक्षापासून बेदाणे करत आहोत.
- बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...