Agriculture news in Marathi Accelerate the work of 'Pokra' in Washim: Collector | Agrowon

वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः जिल्हाधिकारी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना गती द्यावी. प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या गावांमधील शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ग्राम कृषी संजीवनी समिती आणि कृषी सहायक स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यंत्रणांना दिले.

वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना गती द्यावी. प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या गावांमधील शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ग्राम कृषी संजीवनी समिती आणि कृषी सहायक स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यंत्रणांना दिले.

नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २९) ‘पोकरा’ प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व ‘आत्मा’ प्रकल्प संचालक शंकर तोटावार, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कालिदास तापी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. बनसोड, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले की, जिल्ह्यातील १४९ गावांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये निवड झाली आहे. यापैकी सूक्ष्म नियोजन प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्प आराखडा मंजूर झालेल्या गावांमधील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. निवड झालेल्या गावांमधील प्रत्येक पात्र शेतकऱ्याची नोंदणी ‘पोकरा’च्या पोर्टलवर होणे आवश्यक असून, या कामाला गती द्यावी. ज्या तालुक्यांमधील नोंदणी कमी आहे, तेथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून मोहीम स्वरुपात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

शेतकऱ्यांना स्वतः अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन सुद्धा आपली नोंदणी करून मागणी नोंदविता येते. संबंधित गावाच्या समूह सहाय्यकांनी यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. ग्राम कृषी संजीवनी समिती आणि कृषी सहाय्यकांच्या स्तरावर शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेत आजपर्यंत प्राप्त झालेले अर्ज दिवाळीपूर्वी निकाली काढावेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...