सौर कृषिपंप योजनेच्या कामांना वेग द्या : नाळे

सोलापूर : ‘‘एचव्हीडीएस आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करावयाची आहेत. हे लक्षात घेऊन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास आणखी वेग द्यावा.’’
  Accelerate the work of solar agricultural pump scheme: Nale
Accelerate the work of solar agricultural pump scheme: Nale

सोलापूर : ‘‘एचव्हीडीएस आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करावयाची आहेत. हे लक्षात घेऊन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास आणखी वेग द्यावा’’, अशी सूचना महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले.

पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलातील विविध योजना व कामांची आढावा बैठक नुकतीच नाळे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. मुख्य अभियंता सुनील पावडे, सचिन तालेवार, अंकुर कावळे उपस्थित होते.

नाळे म्हणाले, ‘‘पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्व मंडल कार्यालयांना मुबलक प्रमाणात वीजमीटर देण्यात आली आहेत. त्यामुळे वेगळी वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा सर्व वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित कराव्यात. ज्या वीजजोडण्यांसाठी नवीन वीजयंत्रणा उभारणे आवश्यक आहे. त्याचे काम देखील ताबडतोब करावे. याकामी अधीक्षक अभियंत्यांनी स्वतः पाठपुरावा करावा.’’

‘‘उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील मंजूर वीजजोडण्या येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे कामांना वेग द्यावा. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी सौर प्रकल्पांसाठी जागांची निवड करण्याचे काम युद्धपातळीवर करा, असेही नाळे यांनी सांगितले. 

कोविड रुग्णालयांना वीजपुरवठ्याची सोय 

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोविड-१९ रुग्णालयांना महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून ठेवावी. सोबतच या रुग्णालयांतील स्वयंचलित जनरेटर (डीजी सेट) देखील सुस्थितीत असल्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित पालिकांचे विद्युत विभाग यांच्या समन्वयातून करावी, असेही आदेश नाळे यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com