पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या ः जलसंपदा राज्यमंत्री कडू

पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या ः जलसंपदा राज्यमंत्री कडू
पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या ः जलसंपदा राज्यमंत्री कडू

अमरावती  : ‘‘८३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत नव्या गावांच्या समावेशासह सुधारित प्रस्ताव, तांत्रिक मान्यता आदी कामे वेळेचे नियोजन करून गतीने पूर्ण करावी,’’ असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. मुख्य अभियंता विजय जगतारे, अधीक्षक अभियंता सुरेश चारथळ, कार्यकारी अभियंता आनंद जवंजाळ, सतीश बक्षी, सुरेंद्र कोपुलवार यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते. ‘‘योजनेत अतिरिक्त २१ गावांचा समावेश नव्याने करण्यात आला असून एकूण १०४ गावांतील ३ लाख  ४ हजार ६८२ लोकसंख्येला लाभ होणार आहे. वाढीव २१ गावांमुळे पुनर्सर्वेक्षण हायड्रालिक संकलन, सुधारित प्रस्ताव, तांत्रिक-प्रशासकीय मान्यता आदी कामे पूर्ण होण्यासाठी वेळेची मर्यादा निश्‍चित करावी व गतीने कामे पूर्ण करावी,’’ असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.  श्री. कडू म्हणाले की, ‘‘काकडा व चमक या गावांचा योजनेत समावेश करावा. घाटलाडकी व इतर ९ गावांसाठी शक्‍य असल्यास योजनेतून किंवा चारघडवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना द्यावी. धनोजा, बेलमंडळी, नागरवाडी आदी विविध गावांचा समावेश असावा. ग्रामीण भागात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी कामांना गती द्यावी. श्री. कडू पुढे म्हणाले की, ग्रामीण परिसरातील पेयजलाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधिकरणाने परिपूर्ण नियोजन करून योजना राबविल्या पाहिजेत. गत बैठकीत मी पाणी टंचाईच्या प्रश्नांवर विविध सूचना केल्या होत्या. त्याबाबत उचित कार्यवाही झालेली नाही. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. सूचनांचे विहित वेळेत पालन झाले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले. योजनेत १०४ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी अंदाजे २२२.६७ कोटी खर्च अपेक्षित आहे, असे श्री. जगतारे यांनी सादरीकरण करताना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com