Agriculture news in Marathi Accelerated pre-planting works in Satara | Agrowon

साताऱ्यात आले लागवडपूर्व कामांना गती

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तापासून आले लागवडीस प्रारंभ होतो. यामुळे आले लागवडपूर्व कामांना गती आली आहे. मशागत, शेणखत पसरणी आदी कामे सुरू झाली आहेत.

सातारा ः जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तापासून आले लागवडीस प्रारंभ होतो. यामुळे आले लागवडपूर्व कामांना गती आली आहे. मशागत, शेणखत पसरणी आदी कामे सुरू झाली आहेत. मागील सहा महिन्यांपासून दरातील घसरणीमुळे या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रात घट होणार आहे.

सातारा जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार हेक्टर पीक घेतले जाते. यामध्ये सातारा, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड या तालुक्यांत सर्वाधिक आले लागवड होते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आले लागवड करण्याची पद्धत आहे. मात्र मागील चार ते पाच वर्षांत मे महिन्यात तापमान वाढत असल्याने जूनमध्ये लागवड करण्याचा कल वाढला आहे. या वेळी मात्र पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावली आहे. यातून तापमान कमी होण्यास मदत झाली आहे. यामुळे १५ मेनंतर आले लागवड सुरू होण्याची
शक्यता आहे.

आले पिकांची ३४ अंश सेल्सिअसच्या आतील तापमानात लागवड केल्यास उगवण चांगली होऊन आले खराब होण्याचा धोका कमी असतो. पूर्वमोसमी पाऊस फायदेशीर ठरत असल्याने सध्या आले लागवडपूर्व कामांना गती आली आहे. यामध्ये शेणखत, मळी, कोंबडी खत टाकणे, नांगरट, रोटर आदी मशागतीची कामे सुरू झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमी कडक निर्बंध असल्याने ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. डिझेल दरवाढीमुळे मशागतीची कामे महागली आहेत.

मागील वर्षीपासून आले पिकातील दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या आल्यास प्रति गाडी (५०० किलो) पाच ते सहा हजार रुपये दर मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आले पिकांची विक्री करता येत नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून आल्याची खरेदी संथ गतीने सुरू आहे. यामुळे दरातही घसरण होत आहे.

२५ ते ३० टक्के घट
दरातील घसरण तसेच कोरोनामुळे करावा लागणारा लॉकडाउन या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांकडून आले बियाण्याची खरेदी कमी झाली आहे. याचा परिणाम आले पिकांच्या क्षेत्रावर होणार आहे. आले पिकांच्या सरासरी क्षेत्रापैकी किमान २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...