agriculture news in marathi, Accelerated wheat intake from Rajasthan, Madhya Pradesh | Agrowon

राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या आवकेत वाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 मे 2019

जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते, व्यापाऱ्यांकडे राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाची आवक वाढली आहे. गहू दरांवर मागील सात-आठ दिवसात दबाव वाढला आहे. लोकवन गव्हाचे दर प्रतिक्विंटल १९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. 

जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते, व्यापाऱ्यांकडे राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाची आवक वाढली आहे. गहू दरांवर मागील सात-आठ दिवसात दबाव वाढला आहे. लोकवन गव्हाचे दर प्रतिक्विंटल १९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. 

स्थानिक क्षेत्रातून गव्हाची आवक कमी आहे. मध्य प्रदेश व राजस्थानमधील मोठ्या व्यापाऱ्यांकडून बाजार समितीमधील खरेदीदार गव्हाचा पुरवठा करून घेत आहेत. चंदोसी, वनफोरसेव्हन प्रकारचा गहू परराज्यातून अधिक येत आहे. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड भागातून लोकवन प्रकारचा गहू येत आहे. मागील महिन्याच्या सुरवातीला गव्हाचे दर २००० ते २२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.

गव्हाची पेरणी चोपडा, यावल, जळगाव, रावेर व मुक्ताईनगर भागात अधिक झाली होती. याच भागातून लोकवन व वनफोरसेव्हन प्रकारच्या गव्हाची आवक सुरू होती. स्वच्छ केलेल्या लोकवन गव्हासाठी शेतकऱ्यांना २३५० रुपयांवर दर मिळाले होते. वनफोरसेव्हन प्रकारच्या गव्हाचे दर ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.  

चोपडा व यावल भागात काही खरेदीदारांनी थेट शेतात जाऊन गव्हाची खरेदी करून घेतली. यात शेतकऱ्यांचा गोण्यांमध्ये गहू भरण्यासह तो बाजारात पोचविण्याचा खर्च वाचला. परंतु परराज्यातून आवक वाढली, तसा दरांवरील दबावही अधिक झाला. दरात मागील सात-आठ दिवसांत कुठलीही सुधारणा झालेली नाही. सध्या जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजार समितीत स्थानिक क्षेत्रातील गव्हाची आवक कमी आहे. काही शेतकऱ्यांनी चांगल्या दरांसाठी गव्हाचा साठा करून घेतला आहे, असे सांगण्यात आले.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...