पुणे जिल्ह्यात भात कापणीला वेग

दिवाळी सणामुळे भात पट्ट्यात अनेक ठिकाणी भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भात उत्पादकांची चांगलीच धावपळ सुरू आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत बऱ्यापैकी कापणी पूर्ण होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
Acceleration of paddy harvest in Pune district
Acceleration of paddy harvest in Pune district

पुणे ः दिवाळी सणामुळे भात पट्ट्यात अनेक ठिकाणी भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भात उत्पादकांची चांगलीच धावपळ सुरू आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत बऱ्यापैकी कापणी पूर्ण होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात भाताचे सरासरी ७२ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ हजार ९६४ हेक्टर म्हणजेच जवळपास १०३ टक्के भाताची पुनर्लागवडी झाल्या होत्या. पश्चिम पट्ट्यात असलेली मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके ही भाताची तालुके म्हणून ओळखली जातात. यंदा पश्चिम भागात वेळेवर पाऊस दाखल झाल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्या होत्या. काही भागांत पावसाचा खंड पडल्याने उशिरानेही लागवडी झाल्याचे चित्र होते.

या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी, फुले समृद्धी अशा वाणाच्या भाताची लागवड केली होती. याशिवाय पार्वती, सोनम, तृप्ती, साईराम या वाणाकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला होता. परंतु शेतकऱ्यांनी सर्वाधिक इंद्रायणी या वाणाची सर्वाधिक लागवड केली होती. सुरुवातीच्या काळात काही भागात चांगला पाऊस असल्याने भात पिके जोमात होती. परंतु कापणीच्या अवस्थेत असताना जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांत भाताचे मोठे नुकसान झाले. ज्या ठिकाणी अधिक नुकसान झाले नाही, तेथील भात पिकांची कापणी अंतिम टप्यात आली आहे. तर अधिक नुकसान झालेल्या ठिकाणी कापणी सुरू असून पिकांच्या उत्पादकतेत घट येत असल्याचे शेतकरी तानाजी लायगुडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com