जळगाव जिल्ह्यात गहू पेरणीला वेग

जळगावजिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र यंदा सुमारे दोन हजार हेक्टरने वाढणार असून, पेरणीला या आठवड्यात वेग आला आहे. खपली गव्हाची पेरणी जिल्ह्यात सुमारे ८० हेक्टरवर झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात गहू पेरणीला गती  Acceleration of wheat sowing in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यात गहू पेरणीला गती Acceleration of wheat sowing in Jalgaon district

जळगाव  : जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र यंदा सुमारे दोन हजार हेक्टरने वाढणार असून, पेरणीला या आठवड्यात वेग आला आहे. यातच आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून देणाऱ्या व बऱ्यापैकी उत्पादनक्षम असलेल्या खपली गव्हाची पेरणी जिल्ह्यात सुमारे ८० हेक्टरवर झाली आहे. ही पेरणी सुमारे १५० हेक्टरवर जाईल. जिल्ह्यात यंदा प्रथमच खपली गव्हाची पेरणी १५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे.  पूर्वहंगामी व हंगामी कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाखालील क्षेत्र रिकामे केले आहे. त्यात गव्हाची पेरणी सुरू आहे. जिल्ह्यात गव्हाची पेरणी १५ ते १७ हजार हेक्टरपर्यंत होत असते. यंदा ही पेरणी सुमारे १९ हेक्टरवर जाईल. कारण मका पिकातही रोगराईने खर्च वाढला आहे. शिवाय त्याचे दरही दबावात आहेत. गव्हाची पेरणी तापी, गिरणा, वाघूर आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात होत आहे. सर्वाधिक पेरणी रावेर, यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा या भागात होईल. पेरणी सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवर झाली आहे. पुढील आठवड्यात पेरणी ६० टक्क्यांवर जाईल.

प्रतिनिधी

जिल्ह्यात मी सर्वप्रथम आघारकर संस्थेने संशोधित केलेल्या खपली गव्हाची पेरणी अडीच एकरात केली होती. चांगले फायदे मला दिसून आले.  त्यासंबंधीचा प्रसार करण्यासाठी कृषी यंत्रणा व मी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांकडून वाणाला मागणी आहे. यामुळे यंदा पेरणी वाढली आहे.  - वैशाली पाटील,  शेतकरी, दसनूर (ता.रावेर, जि.जळगाव), मो.क्र. - ७६२०२३९१३६

खपली गव्हाचे एकरी 12 क्विंटल उत्पादन जिल्ह्यात खपली गव्हाची देखील यंदा प्रथमच १५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली आहे. सर्वप्रथम २०१७-१८ मध्ये दसनूर (ता.रावेर) येथील शेतकरी वैशाली पाटील यांनी पुणे येथील आघारकर संस्थेतर्फे संशोधित खपली गव्हाच्या एएसीएस २९७१ या वाणाची (सत्यप्रत) अडीच एकरात पेरणी केली होती. एकरी सुमारे ४० किलो बियाणे पेरणीसाठी लागते. त्यांना एकरी १२ क्विंटल उत्पादन आले होते. हा वाण आरोग्यदायी व चांगले उत्पादन देणारा असल्याने शासनाच्या कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) शेतकरी गटांना प्रात्यक्षिकासंबंधी हे बियाणे मोफत दिले आहे. सुमारे ७५ एकरात याची पेरणी यंदा जिल्ह्यात झाल्याची माहिती आहे. तसेच वैशाली पाटील यांनी खपली गव्हाच्या एएसीएस २९७१ वाणाच्या सत्यप्रत बियाण्याची माफक दरात थेट शेतकऱ्यांना विक्री सुरू केली. यामुळे ही पेरणी १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे. पेरणी आणखी सुरूच राहील. यामुळे खपली गव्हाची पेरणी सुमारे १५० हेक्टरवर होवू शकते, असाही अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com