agriculture news in marathi Accept crop insurance, compensation in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य करा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

नांदेड : ‘‘शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा व भरीव नुकसानभरपाई दसऱ्यापुर्वी मंजूर करा; अन्यथा दसऱ्यानंतर मोठे आंदोलन छेडले जाईल.’’

नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचे असेल, तर तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन भागणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा व भरीव नुकसानभरपाई दसऱ्यापुर्वी मंजूर करा; अन्यथा दसऱ्यानंतर मोठे आंदोलन छेडले जाईल,’’ असा इशारा शेतकरी-कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक कैलास येसगे - कावळगावकर यांनी दिला.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही फक्त पंचनामे अन् दौऱ्यांचे सोपस्कार पूर्ण करण्यातच शासन व प्रशासन धन्यता मानत आहेत. आता दौरे बंद करून शेतकऱ्यांना भरीव मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. रब्बीची पेरणी व दसरा-दिवाळीसारखे महत्वपूर्ण सण कसे साजरे करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. म्हणून समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. 

निवेदनानुसार एनडीआरएफ, एसडीआरएफचे निकष बदलून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, संपूर्ण जोखीम रक्कमेचा पीकविमा द्यावा, असे आदेश विमा कंपन्यांना द्यावे, कर्जमाफीची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावून गरजू शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज द्या आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

दसऱ्याच्या पुर्वी शासनाने योग्य निर्णय नाही घेतला, तर शेतकऱ्यांच्या वतीने सिमोल्लंघन केले जाईल. या प्रसंगी समितीचे निमंत्रक कैलास येसगे, कॉ. गंगाधर गायकवाड, प्रबुद्ध चित्ते, प्रा. इरवंत सुर्यकार, प्रा. डॉ. प्रकाश हिवराळे, कॉ. अंकूश माचेवाड, दिलीप पाटील, प्रविण महाराज इनामदार, गजानन पाटील, सुभाष जाधव उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...