agriculture news in Marathi accept demand otherwise milk supply will stop Maharashtra | Agrowon

मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा बंद करू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही दूध उत्पादक मोठ्या अडचणीत सापडलो आहोत. त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत येत्या ३१ जुलैपर्यंत सकारात्मक सकारात्मक विचार करावा, अन्यथा दूध धंदा परवडत नसल्यामुळे आम्ही दूधपुरवठा बंद करू.

औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही दूध उत्पादक मोठ्या अडचणीत सापडलो आहोत. त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत येत्या ३१ जुलैपर्यंत सकारात्मक सकारात्मक विचार करावा, अन्यथा दूध धंदा परवडत नसल्यामुळे आम्ही दूधपुरवठा बंद करू, असे निवेदन शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

चार महिन्यांपासून कोरोना संकटामुळे दुधाला अत्यल्प दर मिळतो आहे. केवळ १५ ते २३ रुपये प्रति लीटर मिळणाऱ्या या दरामुळे दूध उत्पादकांचा होणारा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. संकटात सापडलेल्या या दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी चार प्रमुख मागण्या शेतकरी नेते धोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या आहेत. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
 
 या आहेत मागण्या

  • म्हशीच्या दुधाला प्रति लीटर ६० रुपये व गाईच्या दुधाला प्रतिलीटर ३५ रुपये दर मिळावा
  • दूध संकलन केंद्रामध्ये असलेले दूध तपासणी यंत्र पारदर्शी असावे (फॅट डिग्री व एसएनएफ)
  • दुधाचे थकलेले पेमेंट त्वरित मिळावे व पुढील पेमेंट नियमित देणे बंधनकारक असावे.
  • पशु खाद्य जनावरांची औषधे व पशुवैद्यकीय सेवा जनावरांचे लसीकरण कमी दरात व तत्काळ मिळावे.

इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...