आधुनिक लागवड तंत्रज्ञान स्विकारा ः डॉ. भाटिया

अर्धापूर, जि.नांदेड : ‘‘सोयाबीन हे एक महत्त्वाचे आर्थिक पीक आहे. सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. सोयाबीनच्या किफायतशीर उत्पादनासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञान, पीक, किड, रोग व्यवस्थापन पध्दतीचा अंगीकार करणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन इंदौर (म.प्र.) येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थचे संचालक डॉ. व्हि. एस. भाटिया यांनी केले.
Accept modern planting technology: Dr. Bhatia

सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योग, यासह खरीप हंगाम तयारी, या विषयावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ध्वनी परिषदेचे आयोजन अर्धापूर (जि.नांदेड) येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग, इंदौर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, जिल्हा कृषी विभाग, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्र, रिलायन्स फाउंडेशनतर्फे करण्यात आले. 

सोयाबीन हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पिक आहे. कोरोनाच्या साथीमुळे बियाण्याची खरेदी, खत नियोजन, हवामान अंदाज, कृषी तज्ञांचे मार्गदर्शन या सर्वांसाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे.

डॉ.भाटिया, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील खत व्यवस्थापन तज्ञ डॉ. डी. एस. कंकाळ, पोखर्णी ‘केव्हिके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, उद्योजक नरेंद्र चव्हाण, शेती तज्ज्ञ डॉ. रावसाहेब शेंदारकर, यशवंत महाविद्यालय नांदेडचे माजी वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस.वडजे, शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. के. के.पाटील, डॉ. आर. बी.पाटील, प्रफुल बनसोड, दशरथ वाळवंटे आदी सहभागी झाले. नांदेड, अर्धापूर, भोकर, उमरी धर्माबाद, हदगाव, देगलूर परिसरातील ५० शेतकरी या चर्चासत्रात सहभागी झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com