दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी अटकेत

सोलापूरः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण्यासाठी तक्रारदाराला दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली.
Accepting a bribe of ten thousand  Magistrate of Huljanti arrested
Accepting a bribe of ten thousand Magistrate of Huljanti arrested

सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण्यासाठी तक्रारदाराला दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली. ती स्वीकारताना मंगळवेढ्यातील हुलजंती महसूल मंडळाचे मंडलाधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे (वय ३४) यानं बुधवारी (ता.२३) लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. 

तक्रारदार शेतकऱ्याने लवंगी, (ता. मंगळवेढा) येथे एक एकर जमीन विकत घेतली होती. खरेदी झाल्यानंतर, खरेदी नोंद करण्यासाठी दस्त लवंगीच्या तलाठ्याकडे दिला होता. त्या नोंदीवर एकाने हरकत घेतली होती. त्या हरकतीची सुनावणी हुलजंतीचे मंडलाधिकारी सत्यवान घुगे यांच्याकडे सुरू होती. या हरकतीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी घुगे याने १० हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पाटील, पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, हवालदार चंद्रकांत पवार, पदमानंद चंगरपल्लू, प्रमोद पकाले यांच्या पथकाने केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com