Agriculture news in Marathi, Accident of Sant sopan mandas Maharaj died in an accident near pune | Agrowon

संत नामदेव महाराजांच्या १७ व्या वंशजांचा अपघाती मृत्यू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात ब्रेक निकामी झालेला जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान तुळशीदास नामदास यांचा मृत्यू झाला. 

या घटनेमुळे येथील वारकरी फडकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे. सोपान महाराज नामदास यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १९) सायंकाळी आळंदी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात ब्रेक निकामी झालेला जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान तुळशीदास नामदास यांचा मृत्यू झाला. 

या घटनेमुळे येथील वारकरी फडकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे. सोपान महाराज नामदास यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १९) सायंकाळी आळंदी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरवर्षी कार्तिक द्वादशीला पंढरपूर येथून श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे आळंदीकडे प्रस्थान होत असते. या परंपरेनुसार हा पायी पालखी सोहळा आळंदीकडे निघाला होता. सोपान महाराज नामदास यांच्यासह शेकडो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोमवारी या दिंडीचा सासवड येथे मुक्काम होता. मंगळवारी पहाटे पालखी सोहळा हडपसरकडे निघाला होता. त्या दरम्यान अपघाताची दुर्दैवी घटना घडली.

सोपान महाराज नामदास हे दरवर्षी या सोहळ्यात सहभागी होत असत. सांप्रदायिक प्रथेबरोबरच ते पारंपरिक शिंपीकाम देखील उत्तम पद्धतीने करत असत. सोपान महाराज नामदास यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा तसेच भाऊ ज्ञानेश्वर महाराज नामदास तसेच एकनाथ महाराज नामदास असा परिवार आहे.


इतर बातम्या
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
नगर जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के...नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने...