प्रशासनाच्या मते फक्‍त एटापल्लीतच दुष्काळ

According to the administration, only the drought in Attapalli
According to the administration, only the drought in Attapalli

गडचिरोली ः सुरुवातीला अनियमित आणि त्यानंतर संततधार पावसामुळे धानाची उत्पादकता प्रभावीत झाली. त्यानंतरही एटापल्ली वगळता इतर ११ तालुक्‍यांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्‍त होत आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड केली जाते. ६२ गावे उजाड आहेत. २०१९-२० या खरीप हंगामात १ हजार ४७७ गावांमध्ये १ लाख ७८ हजार ७१६ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली. 

या वर्षी अगदी सुरुवातीपासून चांगला पाऊस पडला. त्यामुळे धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. सतत पडत असलेल्या पावसामुळे खोलगट शेतजमिनीतील पीक वाहून गेले. तर सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यांत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका एटापल्ली तालुक्‍याला बसला होता. त्यामुळे या तालुक्‍यातील सर्वच्या सर्व १९४ गावांची पैसेवारी ०.४६ टक्‍के जाहीर करण्यात आली आहे. ज्या गावांची पैसेवारी ५० टक्‍क्यांपेक्षा कमी राहते, अशा गावांमध्ये दुष्काळ निवारण उपाययोजना राबविल्या जातात. परंतु जिल्ह्यातील १२८३ गावांची पैसेवारी ५० टक्‍क्यांहून अधिक आहे. 

मॉन्सूनोत्तर पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान काळवंडले. त्यामुळे नुकसान होऊनही पैसेवारी अधिक जाहीर करण्यात आली. त्यामुळे हे शेतकरी दुष्काळी उपाय योजनांपासून वंचित राहणार आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती रोष निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com