सप्तश्रृंगगडावर परंपरेनुसार किर्तीध्वज फडकला

वणी, जि. नाशिक : सप्तशृंगगडावर दरवर्षी चैत्रोत्सवातील उत्साहानिमित्त परंपरागत कीर्तीध्वजाचा सोहळा मंगळवारी (ता. ७) झाला. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द असल्याने भाविकांअभावी कार्यक्रम पार पडले. आदिमायेचे रूप व शिखरावर डौलात फडकलेला कीर्तीध्वजाचे दर्शन लवकरच घेता यावे यासाठी लाखो भाविकांनी आपल्या घरी बसून आदिमायेचे पूजन केले आहे.
According to tradition, fame flown at the saptashrungi fort

चैत्रोत्सवातील चतुर्दशीला धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने याच दिवशी आदिमायेच्या शिखरावर कीर्तीध्वजाचे ध्वजारोहनाची सुमारे पाचशे वर्षांची पंरपरा आहे. या दिवशी गडावरील हा अद्भुत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक उन्हा तान्हाची तमा न बाळगता मजल दरमजल करत गडावर येत असतात. अन् आदिमायेपुढे नतमस्तक झाल्यानंतर शिखरावर फडकलेला कीर्तीध्वजाचे दर्शन घेऊन माघारी परततात. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी झाली नाही.

भाविकांच्या गर्दीने फुलणारा सप्तशृंगी गड व वाहनांनी भरलेले रस्ते इतिहासात प्रथमच सुनेसुने बघावयास मिळाले. मंगळवारी (ता. ७) आदिमायेची नित्यनियमात पंचामृत महापूजा सकाळी ९ वाजता झाली. दुपारी साडेतीन वाजता श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात कीर्तीध्वजाचे पूजन सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते झाले. कीर्तीध्वज व ४१ प्रकारचे पूजेचे साहित्य ध्वजाचे मानकरी दरेगावचे एकनाथ गवळी पाटील व सहकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला.

यावेळी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व अटीचे पालन करीत गवळी पाटील यांनी रात्री ७ वाजता आदिमायेचे दर्शन घेऊन शिखरावर जाताना मार्गातील सर्व देव देवतांचे पूजन करीत मध्यरात्री गडावर कीर्तीध्वज फडकवला. दरम्यान या चैत्रोत्सवाची लाखो भाविकांची शेकडो वर्षांची वडिलोपार्जित अखंडपणे सुरू राहणारी चैत्रोत्सव वारी खंडीत झाली असली तरी भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून ‘कोरोना’चे आलेले संकट लवकरच दूर व्हावे व यासाठी घरी बसून आदिमायेला दीप प्रज्वलित करून मनोभावे प्रार्थना केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com