`व्हर्च्युअल गॅलक्‍सी'च्या देणेबाकीवर, जिल्हा बॅंकेचा दावा लवादाने फेटाळला

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि व्हर्च्युअल गॅलॅक्‍सी इन्फोटेक प्रा.लि. यांच्यात २०१७ पासून सुरू असलेल्या दाव्याचा निर्णय अखेर व्हर्च्युअल गॅलेक्‍सीच्या बाजूने लागला. कंपनीने लवादाकडे केलेला दावा आणि दाव्याची रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने अदा करावी, असा आदेश या लवादाने दिला आहे.
On account of virtual galaxy, The arbitral tribunal rejected the District Bank's claim
On account of virtual galaxy, The arbitral tribunal rejected the District Bank's claim

सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि व्हर्च्युअल गॅलॅक्‍सी इन्फोटेक प्रा.लि. यांच्यात २०१७ पासून सुरू असलेल्या दाव्याचा निर्णय अखेर व्हर्च्युअल गॅलेक्‍सीच्या बाजूने लागला. कंपनीने लवादाकडे केलेला दावा आणि दाव्याची रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने अदा करावी, असा आदेश या लवादाने दिला आहे. बॅंकेतर्फे करण्यात आलेले सर्व दावे लवादाने फेटाळले आहेत. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने २०१२ मध्ये व्हर्च्युअल गॅलॅक्‍सी या कंपनीला कोअर बॅंकिंगचे काम दिले होते. कंपनीने हे काम उत्तमरीत्या पूर्ण केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कोअर बॅंकिंग प्रणाली योग्यरीत्या राबविल्याबद्दल नाबार्डने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला चार कोटी बेचाळीस लाख रुपयांची प्रोत्साहनपर मदत सुद्धा दिली आहे.

या कंपनीच्या उत्कृष्ट कामाची पावती नाबार्ड तर्फे बॅंकेस मिळाल्याचा मुद्दाही या प्रकरणात प्रकर्षाने मांडण्यात आला. कंपनीचे संपूर्ण काम सुरळीतपणे सुरू असतानाही बॅंकेतर्फे कंपनीचे केलेल्या कामाचे देयके देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यामुळे बॅंकेकडे बरीच मोठी रक्कम थकीत झालेली होती. 

थकीत देयकांकरिता कंपनीने बॅंकेकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, बॅंक दाद देत नव्हती. त्यामुळे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दावा केला. न्यायालयाने या प्रकरणासाठी १४ जानेवारी २०१९ रोजी पुण्यातील निवृत्त न्यायाधीश माधव मकरे यांची लवाद म्हणून नियुक्ती केली. बॅंकेने कंपनीच्या दाव्याची संपूर्ण रक्कम व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे. कंपनीतर्फे ॲड. चेतन ढोरे, बॅंकेतर्फे ॲड. अभय इनामदार यांनी कामकाज पाहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com