Agriculture news in marathi In the Acharya area The floodwaters penetrated | Agrowon

आचरा परिसरात उधाणाचे पाणी घुसले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 एप्रिल 2021

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील आचरा परिसरातील चिंदर लब्देवाडी, साटमवाडी या परिसरात उधाणाचे खारे पाणी घुसल्यामुळे या भागातील उन्हाळी भाजीपाला, भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील आचरा परिसरातील चिंदर लब्देवाडी, साटमवाडी या परिसरात उधाणाचे खारे पाणी घुसल्यामुळे या भागातील उन्हाळी भाजीपाला, भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खाऱ्या पाण्यामुळे शेकडो एकर जमीन नापिक होण्याची भीती देखील निर्माण झाली आहे.

आचरा परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ, सुपारीच्या बागा आहेत. या शिवाय येथील शेतकरी उन्हाळी भाजीपाला, भातपीक घेतात. परंतु गेल्या काही वर्षात उधाणामुळे समुद्राचे, खाडीचे खारे पाणी शेतजमिनीत घुसून शेतीचे नुकसान होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे नुकसान होऊ नये म्हणून येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे खारलॅण्ड बंधारा उभारण्याची मागणी केली होती. परंतु बंधाऱ्याचे काम अजुनही मार्गी लागलेले नाही. गेले काही दिवस समुद्राला उधाण आले होते. या उधाणाचे खारे पाणी चिंदर लब्देवाडी, साटमवाडी परिसरातील शेतीत घुसले.

या पाण्यामुळे भाजीपाला, भातशेतीचे पूर्णतः नुकसान झाले होते. या शिवाय चवळी, कुळीथ, मुग शेतीचे देखील नुकसान झाले आहे. सातशे एकर शेतजमिनीत पाणी घुसल्यामुळे ही शेतजमीन देखील नापिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात सरपंच राजेश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, कृषी सहाय्यक सुनील कदम, महेंद्र मांजरेकर यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली.

बंधाऱ्याचे काम पूर्ण करा
खाडीचे पाणी शेतजमिनीत घुसू नये म्हणून शेतकऱ्यांनी शासनाकडे खारलॅण्ड बंधाऱ्याची मागणी केली होती. बंधारा मंजूर देखील झाला परंतु, हा बंधारा सध्या अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे शेतजमिनीत खारे पाणी घुसून नुकसान होत आहे. या बंधाऱ्यांचे काम तत्काळ पूर्ण करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...