वर्धा जिल्ह्यात २३६ खासगी विहिरींचे करणार अधिग्रहण

वर्धा जिल्ह्यात २३६ खासगी विहिरींचे करणार अधिग्रहण
वर्धा जिल्ह्यात २३६ खासगी विहिरींचे करणार अधिग्रहण

वर्धा  ः भविष्यातील टंचाईची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला आहे. मार्च ते जूनदरम्यान २३६ खासगी; तर १४२ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करण्यात येईल. जिल्ह्यात ५०५ टंचाईग्रस्त गावे असून त्यासाठी ६९७ उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी आठ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. मार्चअखेर ६८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून, एप्रिल ते जून यादरम्यान १६८ विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे; तसेच १२० गावांमधील १४२ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय ९१ गावांतील १०२ विंधन विहिरींसाठी ८६.७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ३१ मार्चअखेर आर्वी २८ गावे, आष्टी २३, कारंजा ४९, सेलू दोन, हिंगणघाट १०; तर समुद्रपूर तालुक्‍यातील ३३ अशी १४५ गावे टंचाईग्रस्त आहेत. त्यासाठी १९४ उपाययोजना केल्या असून २ कोटी ६९ लाख निधीची तरतूद करण्यात आली. त्यातून २९ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करणे, ६८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे; तसेच ६९ दुरुस्तीची कामे व २८ नवीन विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत.   एप्रिल ते जून २०२० या तिसऱ्या टप्प्यात पाणीटंचाई निवारणार्थ आर्वी तालुक्‍यातील ४१ गावांसाठी ८६.२१ लाख, आष्टी २९ गावे, ३७.९४ लाख, कारंजा १४ गावे, ९.६८ लाख, वर्धा ६८ गावे, ११५. ७७ लाख, सेलू ४१ गावे, ६०.२६ लाख, देवळी ४० गावे, ७८.०५ लाख, हिंगणघाट ६० गावे, ९७.९१ लाख, समुद्रपूर ६७ गावांसाठी ११९.०६ लाख याप्रमाणे जिल्ह्यातील ३६० गावांत ५०३ उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी सहा कोटी ४ लाख ८८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने भविष्यातील टंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला असला तरी, प्रत्येक नागरिकाने आत्तापासून पाण्याचा जपून वापर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ६५ गावांत ७४ नवीन विंधन विहिरी पाणीटंचाई निवारणार्थ राबविण्यात आलेल्या कृती आराखड्यात ६५ गावांत ७४ विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ६२.९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. याशिवाय १३९ गावांतील पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी ४१७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com