agriculture news in marathi, Acquisition of 507 wells in Khandesh for water supply | Agrowon

पाणीपुरवठ्यासाठी खानदेशात ५०७ विहिरी अधिग्रहित
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

जळगाव : पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात सुमारे ५०० गावांमध्ये ५०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. आवश्‍यकतेनुसार तात्पुरत्या पाणी योजनांबाबत कार्यवाही सुरू आहे. परंतु टॅंकरची मागणी मात्र कायम असून, त्यांची संख्या खानदेशात २१० पर्यंत पोचली असल्याची माहिती मिळाली. 

जळगाव : पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात सुमारे ५०० गावांमध्ये ५०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. आवश्‍यकतेनुसार तात्पुरत्या पाणी योजनांबाबत कार्यवाही सुरू आहे. परंतु टॅंकरची मागणी मात्र कायम असून, त्यांची संख्या खानदेशात २१० पर्यंत पोचली असल्याची माहिती मिळाली. 

जळगाव जिल्ह्यात २४२ गावांसाठी २४७ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. ४६ गावांना ४३ ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. ५४ गावांना ९९ विहिरी मंजूर आहेत. ३८ गावांसाठी ५२ नवीन कूपनलिका सुरू केल्या आहेत. ४५ गावांमध्ये विहीर खोलीकरणाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील तापमान कमी-अधिक होत असले, तरी जमिनीतील पाण्याची पातळी मात्र खोल खोल जात आहे. 

पिण्याच्या पाण्याची टंचाईही वाढत आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात १४७ गावांना टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील मिळून १५० गावांमध्ये टंचाईस्थिती गंभीर आहे. संबंधित गावांमध्ये विहीर खोलीकरण, नव्या कूपनलिका तयार करूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने टॅंकर सुरू करावे लागले आहेत.  

जळगाव जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी ९१ टॅंकर होते. पाच दिवसांत ती संख्या १०२ पोचली. नंतर ती १३० वर पोचली. अवघ्या पंधरा दिवसांत ४७ टॅंकर वाढले. चाळीसगाव तालुक्‍यात २९ व अमळनेरात २३ टॅंकर सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, चोपडामध्ये, तर नंदुरबारमधील तळोदामध्ये टॅंकर सुरू नसल्याची माहिती मिळाली. 

नंदुरबार तालुक्‍यात ३५ पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. धुळ्यात साक्री, धुळे व शिंदखेड्यात मिळून ५० पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. तात्पुरत्या पाणी योजनांबाबतही प्रशासनाला यश येत नसल्याची स्थिती आहे. ३६ कोटींचा आराखडा जळगाव जिल्ह्यात टंचाईसंबंधी तयार झाला होता. तो वाढविण्याची वेळ येईल, अशी स्थिती आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...