धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे अधिग्रहण

धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे अधिग्रहण
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे अधिग्रहण

धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत वाढत आहे. दुष्काळाची समस्याही गंभीर होत आहे. धुळे जिल्ह्यातील एकट्या शिंदखेडा तालुक्‍यात सुमारे ४८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. १६ टॅंकर सुरू आहेत. नंदुरबारातही ४० पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण झाल्याची माहिती आहे. 

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे आणि शिरपुरात दुष्काळी स्थिती भीषण आहे. धुळ्यातील ८० टक्के गावांना हिवाळ्यातच पाणीटंचाई जाणवत आहे. शिंदखेड्यातील सर्व १४३ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. मुख्य पीक कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग आहे. यंदा कुठलीही पिके आली नाहीत. केवळ २२ जून आणि १६ ऑगस्टला पाऊस झाला. धुळे व शिरपुरातही अशीच स्थिती आहे. तेथेही दुष्काळ जाहीर झाला आहे.

सध्या शिंदखेडा तालुक्‍यातील आठ गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. ४३ गावांच्या पाण्यासाठी ४८ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात काही दिवसांत अनेक गावांची भर पडण्याची शक्यता आहे. 

नंदुरबारमध्ये नंदुरबार व शहादा तालुक्‍यात सुमारे ४० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यात १६ टॅंकर सुरू आहेत. त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

टॅंकरच्या मागणीसाठी अनके ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले आहेत. अजूनही मागणी सुरूच आहे. रब्बी हंगाम अडचणीत आहे. पशुधनाला पुरेसे पाणी व चारा उपलब्ध करण्यातही अडचणी येत आहेत. चारा महागला आहे. चार ते साडेचार हजार रुपये प्रतिशेकडा, असे ज्वारीच्या चाऱ्याचे दर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com