अवैध बोअरवेलप्रकरणी प्रशासनाकडून कारवाई

आदेश झुगारत लॉकडाउनच्या परिस्थितीचा फायदा घेत अवैध बोअरवेल खोदण्यात येत आहेत. अशाच एका बोअरवेल मशिनचालकावर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
Action by administration in illegal borewell case
Action by administration in illegal borewell case

अमरावती ः ड्रायझोन जाहीर करण्यात आल्याने मोर्शी, वरुड तालुक्‍यांत बोअरवेल घेण्यास बंदी आहे. हा आदेश झुगारत लॉकडाउनच्या परिस्थितीचा फायदा घेत अवैध बोअरवेल खोदण्यात येत आहेत. अशाच एका बोअरवेल मशिनचालकावर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

वरुड, मोर्शी या दोन्ही तालुक्‍यांत संत्रा, मोसंबी लागवड सर्वाधिक आहे. त्यामुळेच हे दोन्ही तालुके विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. वरुड तालुक्‍यात सुमारे २० हजार ६०० हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. मात्र संत्रा बागा वाचविण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाला. त्यामुळे या भागात पाणीपातळी खालावली आहे. शासनाने याची दखल घेत हा भाग ड्रायझोन घोषित केला. त्यानुसार या भागात नव्या बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. मात्र हा बंदी आदेश झुगारत प्रशासनाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर अवैध बोअरवेल घेतल्या जातात. २००२ पासून ड्रायझोन जाहीर करण्यात आलेल्या या क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी २०१९ पासून वरुड आणि प्रतिबंधित क्षेत्रात रिंग माउंटेड बोअर मशिनला बंदी घातली आहे. परंतु तालुक्‍यातील काही दलाल ५० हजार रुपये अधिक घेत अवैध बोअरवेल खोदून देत असल्याची चर्चा आहे.

बारगाव शिवारात पकडली बोअर मशिन बारगाव शिवारात सागर कोहळे यांच्या शेतात मध्यरात्री बोअर करणे सुरू होते. या माहितीवरून नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, मंडळ अधिकारी प्रमोद राऊत, तलाठी, बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटे, जमादार गजानन कडू, प्रदीप खेरडे यांनी शिवारात जात कारवाई केली. या वेळी बोअरिंग वाहन, पाइप जप्त करण्यात आले. त्यासोबतच चालक श्रावण अय्यपन आणि एजंट गजानन कोरडे यांच्या पंचनाम्यावर सह्या घेत हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com