Agriculture news in Marathi Action by administration in illegal borewell case | Page 2 ||| Agrowon

अवैध बोअरवेलप्रकरणी प्रशासनाकडून कारवाई

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

आदेश झुगारत लॉकडाउनच्या परिस्थितीचा फायदा घेत अवैध बोअरवेल खोदण्यात येत आहेत. अशाच एका बोअरवेल मशिनचालकावर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

अमरावती ः ड्रायझोन जाहीर करण्यात आल्याने मोर्शी, वरुड तालुक्‍यांत बोअरवेल घेण्यास बंदी आहे. हा आदेश झुगारत लॉकडाउनच्या परिस्थितीचा फायदा घेत अवैध बोअरवेल खोदण्यात येत आहेत. अशाच एका बोअरवेल मशिनचालकावर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

वरुड, मोर्शी या दोन्ही तालुक्‍यांत संत्रा, मोसंबी लागवड सर्वाधिक आहे. त्यामुळेच हे दोन्ही तालुके विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. वरुड तालुक्‍यात सुमारे २० हजार ६०० हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. मात्र संत्रा बागा वाचविण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाला. त्यामुळे या भागात पाणीपातळी खालावली आहे. शासनाने याची दखल घेत हा भाग ड्रायझोन घोषित केला. त्यानुसार या भागात नव्या बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. मात्र हा बंदी आदेश झुगारत प्रशासनाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर अवैध बोअरवेल घेतल्या जातात. २००२ पासून ड्रायझोन जाहीर करण्यात आलेल्या या क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी २०१९ पासून वरुड आणि प्रतिबंधित क्षेत्रात रिंग माउंटेड बोअर मशिनला बंदी घातली आहे. परंतु तालुक्‍यातील काही दलाल ५० हजार रुपये अधिक घेत अवैध बोअरवेल खोदून देत असल्याची चर्चा आहे.

बारगाव शिवारात पकडली बोअर मशिन
बारगाव शिवारात सागर कोहळे यांच्या शेतात मध्यरात्री बोअर करणे सुरू होते. या माहितीवरून नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, मंडळ अधिकारी प्रमोद राऊत, तलाठी, बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटे, जमादार गजानन कडू, प्रदीप खेरडे यांनी शिवारात जात कारवाई केली. या वेळी बोअरिंग वाहन, पाइप जप्त करण्यात आले. त्यासोबतच चालक श्रावण अय्यपन आणि एजंट गजानन कोरडे यांच्या पंचनाम्यावर सह्या घेत हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास...सांगली ः कर्नाटक आणि इतर राज्यांतून येणारा आंबा...
कांदा बियाण्यांत फसवणूक; कृषी विभाग...नगर ः रब्बीत कांदा लागवड करण्यासाठी यंदा गावराण...
नगर, नाशिकमध्ये दीड कोटी टन उसाचे गाळपनगर : नगर व नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६ साखर...
साताऱ्यात ३२३ हेक्‍टरवर पिकांचे मोठे...सातारा : नुकत्याच झालेल्या पूर्वमोसमी वादळी पाऊस...
पुणे जिल्हा बँकेत ११०० कोटींवर ठेवी;...पुणे : देशातील अग्रगण्य पुणे जिल्हा मध्यवर्ती...
सातारा जिल्ह्यात रब्बीत १४४ टक्के कर्ज...सातारा : रब्बी हंगाम सर्वच बँकांनी पीककर्ज वितरण...
डाळिंब पिकाचे २१पासून ऑनलाइन प्रशिक्षणऔरंगाबाद : येथील कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड व...
बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमीनगर : संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात...
सोलापूर जिल्ह्यात 'पूर्वमोसमी'चा २३००...सोलापूर : जिल्ह्यात चार- पाच दिवस झालेल्या...
सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी प्रकल्प...औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील आडगाव (भोंबे) येथील...
पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने...अकोलाः दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण...
अकोला ‘झेडपी’च्या जमिनीला मिळाला २२...अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली शेती ११...
अकोल्यात ५०० बेडचे कोविड हॉस्पिटल उभारा...अकोला : शहर व जिल्ह्यातील कोविड-१९ च्या...
मोताळा कृषी कार्यालयात कोरोनाचा शिरकावबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून...
‘ताकारी’चे तिसरे आवर्तन २२ एप्रिलपासून...सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे आत्तापर्यंत...
‘म्हैसाळ’च्या पाण्याने तलाव भरून घ्या...जत, जि. सांगली : म्हैसाळ योजनेचे काम अंतिम...
कालव्या अभावी भंडाऱ्यात रखडले सिंचनभंडारा : साठ किलोमीटरचा कालवा पूर्ण होऊन अवघ्या...
वर्धा जिल्ह्यात चार लाख हेक्‍टरवर होणार...वर्धा : जिल्ह्यात खरिपाची लगबग वाढीस लागली आहे....
चहा खाणारे म्यानमारी लोकचहा प्यायचा असतो, हे आपल्याला माहिती आहे. नेहमीचा...
शेतकरी नियोजन पीक : काजूपारपोली आणि बांदा (ता.सावंतवाडी) या ठिकाणी माझी...