कृषी केंद्रात दरफलक नसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई ः कृषिमंत्री भुसे

कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या दुकानदाराने त्यांच्याकडील उपलब्ध साठा व दर पत्रकाचा फलकज्या दुकानात असा फलक लावलेला नसेल, त्याचा फोटो काढून पाठवा, अशा क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार: कृषिमंत्री दादा भुसे
Action against officials if there is no tariff in agriculture center: Agriculture Minister Bhuse
Action against officials if there is no tariff in agriculture center: Agriculture Minister Bhuse

नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या दुकानदाराने त्यांच्याकडील उपलब्ध साठा व दर पत्रकाचा फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. ज्या दुकानात असा फलक लावलेला नसेल, त्याचा फोटो काढून पाठवा, अशा क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी विक्रेत्यांसह कृषी अधिकाऱ्यांना दिला.

कृषिमंत्री श्री. भुसे यांनी शेतकरी संवाद दौऱ्यात देवळा तालुक्यातील खते व बियाणांच्या पुरवठ्याबाबत रविवारी (ता. १२) आढावा बैठक घेतली. यावेळी नेते बोलत होते. बैठकीस चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, आत्माचे प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, कळवण उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार, उपसभापती श्री. देवरे, गटविकास अधिकारी आर. ए. देशमुख, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की खते व बियाण्यांचा लक्ष्यांक पूर्ण करण्यात आला आहे. रासायनिक खतांच्या बाबतीत काही साठेबाजांकडून अफवांचे पीक पसरवले जात असल्याचे स्पष्ट करून राज्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध असून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शासनाने कृषी विभागाकडे बफर स्टॉक करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला शेतकरी, कृषी साहाय्यकांचा सन्मान ‘महिला शिकली की सर्व घर शिकते’ या विचारातून कृषी विभागाअंतर्गत महिला शेतीशाळा सुरू केल्या आहेत. महिला शेतीशाळेमुळे ‘चूल व मूल’ या संकल्पनेतून महिला बाहेर पडताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच महिला शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाची धुरा सांभाळणाऱ्या महिला कृषी साहाय्यकांसह महिला शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com