सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश ः डॉ. बोंडे

अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी इच्छुकांची सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येऊ नये, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. बारावीतील गुण व सातबाऱ्यांमुळे वाढणाऱ्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
Action against officials if there is no tariff in agriculture center: Agriculture Minister Bhuse

राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. अशातच बारावीच्या निकालानंतर राज्यात कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची झुंबड उडते. तत्कालीन फडणवीस सरकारने कृषी अभ्यासक्रमाकरिता वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणे सीईटी सक्तीची केली होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीईटी घेणे शक्य होणार नाही.

कृषी अभ्यासक्रमाच्या विविध विद्याशाखेकरिता तब्बल एक लाखावर विद्यार्थी सीईटी देतात. एकाच ठिकाणी इतके विद्यार्थी गोळा झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे यावेळी सीईटी रद्द करून बारावीतील जास्तीत जास्त गुणांच्या आधारे मेरीट निश्चित करावा. त्यासोबतच इतर वेळेप्रमाणे सातबारा असलेल्या शेतकरीपूत्रांना दिले जाणारे गुण एकत्रित करुन प्रवेश दिला जावा, अशी सूचनाही भाजप नेते माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्य शासनाकडून या सूचनेची कशाप्रकारे दखल घेतली जाते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यावेळी कृषी अभ्यासक्रमाकरिता सीईटी घेणे सयुक्तिक ठरणार नाही. सीईटीला एक लाख विद्यार्थी राहतील. त्यामाध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मेरीट आणि सातबारा या दोन घटकांच्या आधारे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी आहे. - डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com