agriculture news in marathi, Action on Banks if Movement: Collector Kalam-Patil | Agrowon

चालढकल केल्यास बँकांवर कारवाई : जिल्हाधिकारी काळम-पाटील

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 जुलै 2018

सांगली : शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत बँकांकडून टाळाटाळ सुरू आहे. पीककर्ज वितरणात चालढकल सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला आहे.

सांगली : शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत बँकांकडून टाळाटाळ सुरू आहे. पीककर्ज वितरणात चालढकल सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला आहे.

पीककर्ज वितरणात उद्दिष्टापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या बँकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात पीककर्ज वितरणामध्ये अनेक बँकांची कामगिरी निराशाजनक असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे एल. एस. कट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज आहे. त्यांची अडवणूक करू नका. पीककर्ज वितरण यंत्रणा गतिमान करा. जिल्ह्यास पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ११०० कोटींचे आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत अनेक बँकांची कामगिरी असमाधानकारक आहे. या बँकांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील राहून पीककर्जाचा पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

बँकांनी केलेले कर्जवाटप आणि उद्दिष्ट
बँकांनी पीककर्जवाटपात केलेली कामगिरी व उद्दिष्ट असे : आंध्रा बँक १ कोटी (११ कोटी), विजया बँक ५४ लाख (५ कोटी), इंडियन ओव्हरसीज बँक ९ लाख (२ कोटी), युनियन बँक १७ कोटी (५४ कोटी), स्टेट बँक ऑफ इंडिया १९ कोटी (६९ कोटी), सेंट्रल बँक ऑफ इंडिया १ कोटी (१७ कोटी), बँक ऑफ महाराष्ट्र ३७ कोटी (७० कोटी), बँक ऑफ बडोदा १५ कोटी (२४ कोटी), आयडीबीआय २ कोटी (१० कोटी), रत्नाकर बँक ४ कोटी (५९ कोटी), आयसीआयसीआय बँक ३३ कोटी (१२८ कोटी).


इतर बातम्या
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...