agriculture news in Marathi, action gramsevak in Akola, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकोला जिल्ह्यात ग्रामसेवकांवर कार्यमुक्तीची कुऱ्हाड
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अकोला ः विविध मागण्यांसाठी २२ ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेलेल्या जिल्ह्यातील तब्बत ३५० ग्रामसेवकांवर कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसेवकांना कार्यमुक्त करून त्यांची कामे इतरांकडून करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

अकोला ः विविध मागण्यांसाठी २२ ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेलेल्या जिल्ह्यातील तब्बत ३५० ग्रामसेवकांवर कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसेवकांना कार्यमुक्त करून त्यांची कामे इतरांकडून करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

शासनाच्या विविध योजना राबवण्यात ग्रामसेवक महत्त्वाची भूमिका बजावतात. शेवटच्या गावापर्यंत, वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना  पोचवण्यासाठी ग्रामसेवक विविध पातळ्यांवर प्रयत्न करतात. मात्र ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र तरीही शासनाकडून मागण्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ग्रामसेवकांनी विविध टप्प्यांमध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा देत थेट २२ ऑगस्टपासून संपूर्ण काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गावगाडा ठप्प झाला असून, विविध अहवाल सादर करण्याला ''ब्रेक'' लागला आहे. 

गावातील कामे मार्गस्थ लावण्यासाठी ग्रामसेवकांकडून २४ तासांच्या आत प्रभार काढून घ्यावा (कार्यमुक्ती) आणि त्याच काळात तो संबंधितांकडे सोपवावा, असे आदेश सीईओ आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. सीईओ आयुष प्रसाद यांच्या आदेशाने ग्रामसेवकांची कामे विस्तार अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, केंद्र प्रमुख व जिल्हा परिषदेच्या शाळांचे  वरिष्ठ मुख्याध्यापक यांना करावी लागणार आहेत.

ग्रामसेवकांचा संप सुरू असल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांची कामे रखडली आहेत. शौचालयांचे अनुदान, टीन पत्रे, पंप खरेदी, ताडपत्रीची  खरेदी आदींच्या रकमा डीबीटीद्वारे दिल्या जातात. ग्रामसेवकांच्या संपामुळे  त्यांनाही 'ब्रेक' बसला आहे. जन्म-मृत्यूचे दाखले देणे, नवीन कामांचे  टेंडरिंग करण्याचे कामसुद्धा संपामुळे बंद आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...