पोषण आहार खराब आढळल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई

पोषण आहार खराब आढळल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई
पोषण आहार खराब आढळल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ, डाळ आदी धान्य उतरविताना त्याची तपासणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. त्यामुळे स्वीकारलेले ध्यान्य खराब आढळून आल्यास त्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील. त्यासंबंधी कारवाईदेखील केली जाईल, अशा सूचना शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आल्या. या सभेत सभापती पोपट भोळे, समिती सदस्य गजेंद्र सोनवणे, विजया पाटील, रवींद्र पाटील, प्रमिला पाटील, हरीश पाटील, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील उपस्थित होते. मुलांना योग्य आहार देण्यासाठी चांगले धान्य स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे धान्य खराब, वजन तपासणीत कमी आढळले किंवा मुदत संपलेले धान्य असल्यास त्यास परत करावे, असेही सांगण्यात आले. जीर्ण, धोकादायक शाळा निर्लेखित करण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर ५१ जिल्हा परिषद शाळांमधील २०६ खोल्यांचे निर्लेखन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३४ शाळा पूर्ण झाल्या असून, २७ शाळा बाकी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर ३६ शाळांचे १९० वर्ग तातडीने निर्लेखित करण्याच्या सूचना सभापती भोळे यांनी दिल्या.

ओपन जिमसाठी मागविले प्रस्ताव क्रीडा विभागाकडून सहावी ते आठवीचे वर्ग भरणाऱ्या शाळांना मैदान, व्यायाम शाळा किंवा ओपन जिम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींकडे तीन एकरपर्यंत जागा उपलब्ध असल्यास, त्या आपल्या गावातील संस्था, शाळांच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवू शकतील. तसेच ज्या विद्यार्थिनी पाच किलोमीटर अंतरापर्यंत माध्यमिक शाळांमध्ये जातात. त्यांना मानव विकास मिशनअंतर्गत सायकलवाटप केले जाईल. संबंधितांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी ११ लाखांची तरतूद राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१३ ते जून २०१८ पर्यंत ० ते १८ वयोगटातील ३४३ मुलांवर हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर ९३७ विद्यार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. शिवाय शाळेत मुलांना खेळताना काही जखमा झाल्यास प्राथमिक उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये प्राथमिक उपचार पेटी लावण्यात येणार आहे. याकरिता ११ लाखांची तरतूद असून, या संदर्भात नियोजनाची चर्चा सभेत करण्यात आली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com