अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर कारवाई

अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले होते. गर्दी टाळण्यासाठी ही सूचना देण्यात आली. परंतू प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता किरकोळ विक्रीचा प्रयत्न काही अडत्यांनी केला. अशा ३२ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
Action of the Market Committee on 32 constraints
Action of the Market Committee on 32 constraints

अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले होते. गर्दी टाळण्यासाठी ही सूचना देण्यात आली. परंतू प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता किरकोळ विक्रीचा प्रयत्न काही अडत्यांनी केला. अशा ३२ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

भाजीपाला यार्डात गर्दी कमी होण्यासाठी उपाययोजनांकरिता अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. २९ मार्च रोजी झालेल्या या बैठकीत सर्व अडत्यांनी गर्दी नियंत्रणासाठी किरकोळ विक्री करणार नसल्याचे मान्य केले. परंतू शनिवारी (ता. ४) काही अडत्यांनी किरकोळ विक्री सुरुच ठेवल्याचे बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

शासन आदेश व बाजार समिती उपविधीचे उल्लंघन केल्यामुळे या ३२ अडत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. बाजार समिती सभापती अशोक दहिकर व सचिव दीपक विजयकर यांनी हे आदेश काढले. या अडत्यांना भाजीपाला यार्डामध्ये भाजीपाला विक्रीस मनाई करण्यात आली आहे. त्यांना यार्डातच प्रवेश निषेध करण्यात आला आहे. परवाना रद्द करण्यात आलेले अडते यार्डात फिरकल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सचिव दीपक विजयकर यांनी दिला. 

यांचे केले परवाने रद्द प्रकाश रामदास शिरभाते, विजय अंबादास शिरभाते, अशोक रामदास उकंडे, इंद्रपाल कालुराम वर्मा, मुस्ताक अहमद अब्दुल रशीद, एस. के. सब्जी भंडार, अब्दुल हबीब, जबी उल्हा शहा, अमरसिंग विजयसिंग ठाकूर आसिफ महमद युसुफ, शेख अनिस शेख हाफीज, शफी खान, श्रीराम बळीराम ढोले, एजाज अली विलायत अली, गणेश सिंग ठाकूर, बुधराम हरिराम चव्हाण, अर्थव चव्हाण, दिनेश कुलका चव्हाण, रोहित मधुकर देऊळकर, रवींद्र बनकर, गोकुळ रामकृपाल वर्मा, सुधाकर बाबाराव धानोरकर, रामगोपाल तिवारी, विलास शिरभाते, दीपक राखोंडे, अनंत टाके, अब्दुल रफीक अब्दुल कादीर, अस्लम शहदा अब्दुल अजीज, अनिल चौकडे, राजाराम लंगड, बिस्मील शेख अमीर बिस्मील्ला यांचे परवाने रद्द करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com