Agriculture news in marathi Action on Six ration store holder in Barshi taluka | Agrowon

बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे सापडलेल्या धान्य साठ्याच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील दुकानांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश शंभरकर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी ही कारवाई केली.

बार्शी तालुक्यातील दोनशे रास्तभाव धान्य दुकानांची दहा मंडल अधिकारी आणि ७८ पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या सहा दुकांनावर कारवाई करण्यात आली. तपासणीत प्रत्यक्ष गावात जावून ४ हजार २०० लोकांचे जबाब घेण्यात आले. त्या जबाबात लोकांनी अंत्येादय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेचे अन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

या दुकानदारांचा समावेश 

संतोष गोडसे, उपळाई ठोंगे यांनी परवान्यात नमुद ठिकाणी व्यतिरिक्त अन्य ठिकाणी धान्याची साठवणूक केली. महिला दुध उत्पादक संस्था, उंबरगे, यांनी साठा रजिस्टर अद्ययावत ठेवले नाही व वजनकाटा पडताळणी करुन घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाची अनामत रक्कम जप्त करण्यासह पाच हजार रुपये दंड केला. 

नारायण गोरे, चिखर्डे, मोहन सपकाळ, झरेगाव आणि शोभाताई सोपल महिला बचत गट पानगाव यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपात ढिलाई केली. त्यामुळे अनामत रक्कम जप्त करुन परवाना निलंबित करण्यात आला. 
 

 
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...