Agriculture news in marathi Action taken against 69 shopkeepers of fertilizers and seeds in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९ दुकानदारांवर कारवाई

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून ११ भरारी पथके आणि गुणनियंत्रण निरिक्षण असे पथक तयार केले होते. गैरकृत्य करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कडक कारवाई केली 
आहे.
- बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकार

सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके, खते, बियाणे दुकानदारांवर कारवाई केली आहे. यातील १८ परवाने रद्द केले आहेत. २० निलंबित केले आहेत. तर, ३३ जणांना सक्त ताकीद देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते गुणवत्तेची उपलब्ध व्हावीत. त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी ३२ गुणनियंत्रक निरिक्षक आणि ११ भरारी पथके आहेत. यंदा खरीप हंगामात महाबीजकडून २१ हजार २१४ क्विंटल, तर खासगी कंपनीकडून ३१ हजार ७११ क्विंटल अशी एकूण ५२ हजार ८५३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. १५ हजार ६९३ शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ६ हजार ९६६ मेट्रिक टन खते आणि ३ हजार ५३ क्विंटल वाणांचे वाटप केले.

बियाण्यांचे २ हजार ६५, खतांचे २ हजार ७६८ आणि कीटकनाशकांचे २ हजार ३२० वितरक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. या दरम्यान, जिल्ह्यातील भरारी पथक आणि गुणनियंत्रक पथकाने कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. यामध्ये ३८२ बियाणे, ६८ कीटकनाशकांचे, २७८ खतांचे नमुने तपासण्यास आले. गुणनियंत्रण कामाच्या तपासणीमध्ये निदर्शनास आलेल्या ६९ दुकांनादारांकडे त्रुटी आढळून आल्या. यामध्ये १८ जणांना निलंबित केले आहे. तर, १८ परवाने रद्द केले आहेत. ३३ जणांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...