भंडारा जिल्ह्यात उद्दिष्टपूर्तीत मागे राहिलेल्या बॅंकांवर कारवाई ः डॉ. गिते

भंडारा जिल्ह्यात उद्दिष्टपूर्तीत मागे राहिलेल्या बॅंकांवर कारवाई ः डॉ. गिते
भंडारा जिल्ह्यात उद्दिष्टपूर्तीत मागे राहिलेल्या बॅंकांवर कारवाई ः डॉ. गिते

भंडारा ः सर्व बॅंकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे. सर्व बॅंकांनी पीककर्ज वाटपास प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.  पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी मंगळवारी (ता. ६) आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक ब्रिजकुमार तसेच बॅंक अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यांपैकी ६४ हजार ९०० सभासदांना ३२२ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून, कर्जवितरणाची टक्‍केवारी ७८ आहे. जिल्हा सहकारी बॅंकेने ९६ टक्‍के कर्जवाटप केले आहे. ज्या बॅंकांनी ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी कर्ज वाटप केले त्यांना उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ज्या बॅंकांनी उद्दिष्ट पूर्ण केले नाही, अशा बॅंकांना वीस दिवसांचा कालावधी देण्यात येत असून, यासाठी शाखा व्यवस्थापकाकडून उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यासाठी अग्रणी बॅंक व्यवस्थापकांनी समन्वयाची भूमिका पार पाडावी. पुढील बैठकीत उद्दिष्ट १०० टक्‍के पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करणे आवश्‍यक असल्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व बॅंकांनी आतापर्यंत केलेल्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेतला. जिल्हा सहकारी बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, युनियन बॅंक यांनी निर्धारित वेळेत चांगले उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले. पीककर्ज वाटपाच्या कामात जिल्हा प्रशासन सर्व बॅंकांना सहकार्य करेल. जे चांगले काम करतील; त्यांचा प्रशासन सत्कार करेल व ज्यांचे काम समाधानकारक नसेल; त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, असे निर्देश त्यांनी बॅंकांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com