Agriculture news in marathi Action taken on sale of essential commodities: Minister Chhagan Bhujbal | Agrowon

जीवनावश्यक वस्तू जादा दराने विकल्यास कारवाई : मंत्री छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

जीवनावश्यक वस्तूंची विक्री चढ्या दराने होणार नाही, याची दक्षता घ्या,’’असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. 

नाशिक : ‘‘कोरोना पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये अधिक दराने धान्य वितरीत करणे, देय प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य वितरीत करणे, स्वस्त धान्य दुकानदारांनी दुकान बंद ठेवणे, आदी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबतीत संबंधित घटकांवर तात्काळ प्रशासकीय व आवश्यक तेथे कायदेशीर कारवाई करावी. जीवनावश्यक वस्तूंची विक्री चढ्या दराने होणार नाही, याची दक्षता घ्या,’’असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. 

अन्न, नागरी पुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार (ता.१०) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भुजबळ यांनी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. राज्य शासनाचे नोडल अधिकारी व प्रधान सचिव महेश पाठक, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे, मुंबईचे शिधा वाटप नियंत्रक कैलास पगारे, सहसचिव सतीश सुपे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, उपनियंत्रकांशी भुजबळ यांनी संवाद साधला. 

भुजबळ म्हणाले, ‘‘राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी कामाचा वेग वाढवून अन्नधान्याचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करा. सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना स्वस्त धान्य वितरणाबाबत संयुक्तिक कार्यपद्धती ठरवून द्यावी. सोयी सुविधांसाठी २४ तास यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. राज्यभरातून अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत आहेत. त्यांचे निराकरण केले जात आहे.’’ 

ज्या जिल्ह्यांनी एकूण उद्दिष्ठाच्या ८० टक्केपेक्षा अधिकचे धान्य वाटप केले, तेथील अधिकाऱ्याच्या कामाची भुजबळ यांनी प्रशंसा केली. तर, कमी अन्नधान्याचे वाटप झालेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

शिवभोजन केंद्रावर पर्यवेक्षण करा 

शासनाने शिवभोजन योजनेची व्याप्ती आता मुंबई शहर आणि जिल्हा मुख्यालयातून तालुक्यांपर्यंत वाढविली आहे. सद्यस्थितीत एक लाख थाळींचे प्रतिदिन उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने सर्व शिवभोजन केंद्रांवर पुरविण्यात येत असलेल्या अन्नाच्या दर्जाबाबत कार्यक्षमपणे पर्यवेक्षण करण्याबाबत सूचना दिल्या. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...