agriculture news in Marathi action on who rumors that CORONA spread by non-veg Maharashtra | Agrowon

मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्याचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी रविवारी (ता. १६) दिले.

पोल्ट्री उद्योगासमोरील अडचणींचा आढावा पशुसंवर्धनमंत्री केदार यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांच्यासह पोल्ट्री उद्योजक पुरवठादार यांची यावेळी उपस्थिती होती.

नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्याचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी रविवारी (ता. १६) दिले.

पोल्ट्री उद्योगासमोरील अडचणींचा आढावा पशुसंवर्धनमंत्री केदार यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांच्यासह पोल्ट्री उद्योजक पुरवठादार यांची यावेळी उपस्थिती होती.

कोरोना वायरस चिकन-मटण खाल्ल्यामुळे होत असल्याचा अपप्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.त्याचा फटका बसत चिकनचे घाऊक दर तीस रुपये किलोवर आले आहेत. उत्पादन खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने पोल्ट्री उद्योजक आर्थिक संकट आले आहेत. 

याची दखल घेत पशुसंवर्धनमंत्री केदार यांनी सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाईचे निर्देश दिले. पशुसंवर्धन सचिवांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणासह देशाच्या काही राज्यांमध्ये पोल्ट्री उद्योग नावारूपास आला आहे.

याकरिता या भागात तेथील सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्याकरिता अभ्यास गट नियुक्त करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. त्या त्या राज्यातील पोषक बाबींचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे.  पोल्ट्री उद्योगाने सोलरच्या वापरावर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

शासकीय पोल्ट्री नियंत्रण समिती
पोल्ट्री उद्योगातील विविध समस्या व अडचणींचा आढावा वेळोवेळी घेता यावा याकरिता शासकीय पोल्ट्री नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी, उद्योजक, शासकीय प्रतिनिधी तसेच शास्त्रज्ञ यांचा या समितीमध्ये समावेश असेल. पोल्ट्री उद्योगाच्या विस्ताराकरिता आवश्यक शिफारशी समिती शासनाला करणार आहे, असेही सुनील केदार यांनी सांगितले. 
 


इतर अॅग्रो विशेष
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...