Agriculture news in marathi, Action will be taken on complaints over telephone in Nagar Zilla Parishad | Agrowon

नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील तक्रारींवर होणार कारवाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

जिल्हा परिषदेमार्फत आता दूरध्वनीवर तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. चौकशीच्या व कारवाईच्या सूचना देण्यात येतील. यामुळे कामे वेगाने होऊन नागरिकांचे प्रश्‍न सोडवणुकीसाठीच हा उपक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी लवकरच एक दूरध्वनी नंबर जाहीर केला जाणार आहे. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा येतात. ग्रामसेवक गावात येत नाहीत. बियाणे मिळत नाही. अशा एक ना अनेक तक्रारी जनतेच्या असतात. आता ग्रामस्थांनी त्या कागदावर करण्याऐवजी थेट दूरध्वनीवर केल्यानंतर त्याची जिल्हा परिषदेमधून तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे एक दूरध्वनी नंबर जाहीर करण्यात येणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहेत. 

जिल्हा राज्यात क्षेत्रफळाने मोठा आहे. जिल्ह्यात एक हजार ६०२ गावे असून, एक हजार ३१३ ग्रामपंचायती आहेत. गावात नळाला पाणी येत नाही. अशुद्ध पाणीपुरवठा होतोय. जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षणाचा दर्जा ढासळत आहे. आरोग्य कर्मचारी उपस्थित नसतात. श्‍वानदंश व सर्पदंशाची लस नाही. साथीचे आजार पसरले, खतांचा तुटवडा आहे, अशा एक ना अनेक तक्रारी प्रत्येक गावामध्ये असतात. या तक्रारी नेमक्‍या कोठे करायच्या? केल्या तर त्याची दखल घेतली जाईल का? असे एक ना अनेक प्रश्‍न सर्वसामान्यांपुढे उभे आहेत.

जिल्ह्यातील अशा तक्रारींवर बऱ्याच वेळा गावा-गावांमध्ये आंदोलने होतात. ती टाळण्यासाठी व नागरिकांचे प्रश्‍न सुटण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे दूरध्वनीवर तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक ठेवण्यात येणार आहे. तक्रारीची नोंद घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल. 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...