agriculture news in Marathi action will be taken in crop insurance fraud Maharashtra | Page 3 ||| Agrowon

पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार नाही ः दादा भुसे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी एकच टोल फ्री नंबर दिला जातो. त्यामुळे कधीकधी नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना संपर्क करता येत नाही.

नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी एकच टोल फ्री नंबर दिला जातो. त्यामुळे कधीकधी नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना संपर्क करता येत नाही. या अशा गोष्टी चालणार नाहीत. कृषी विभागाचे कुणी अशा चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिला. 

कृषिमंत्री भुसे हे अमरावती दौऱ्यावर असताना  विमा कंपनीच्या प्रतिनिधीने कृषिमंत्र्यांचीच दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अमरावती कृषी सहसंचालक कार्यालयात आढावा बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान व पीकविमा कामकाजाबाबत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या होत्या. याबाबत कृषिमंत्री म्हणाले, की पीक विम्यासंबंधी कामाची पूर्तता करून घेणे कृषी विभागाची जबाबदारी आहे. जे करून घेणार नाही त्यांना नोटिसा दिल्या जातील. 

‘‘राज्यात सुरू असलेली  पीक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार असल्याने त्यानुसार कामकाज करावे लागत आहे. त्यामध्ये काही बदल करणे अपेक्षित आहे. जसे की, सरासरी उत्पादन हिशोबाला धरले जाते. मात्र  काही जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे  हानी होत असल्याने सरासरी उत्पादन कमीच आहे. मात्र त्यापेक्षा जास्त उत्पादन आल्यास नुकसान भरपाई दिली जात नाही. अशा काही गोष्टीत बदल करून घेणे अपेक्षित आहे. मात्र आज घडीला जे अस्तित्वात असणारे नियम आहेत. त्या नियमांवर चालून कामकाज सुरू आहे,’’ असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. कोणत्या भागात, कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले आहे आशा पद्धतीने महाराष्ट्रव्यापी आढावा घेऊन क्षेत्र व  पिकाच्या नुकसानीच्या पातळीच्या संदर्भात राज्य पातळीवर निर्णय घेतला जाईल. आम्ही शासकीय पातळीवरून केंद्र सरकारकडे त्याअनुषंगाने मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

तातडीची मदत देण्याची कार्यवाही सुरू 
प्रशासनाच्या माध्यमातून तातडीची मदत देण्याची कार्यवाही  राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय झाला असून ‘उणे हेड'मधून महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी पातळीवर मदत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. तातडीच्या मदतीचा समावेश त्यामध्ये असणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर बातम्या
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...