agriculture news in marathi, activist arrested for security, nashik, maharashtra | Page 2 ||| Agrowon

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ठेवले नजरकैदेत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान मागील चार-पाच वर्षे झाले. याचा निषेध आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा व्हावी, म्हणूनच आम्ही मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. पोलिसांनी आम्हाला नजरकैदेत ठेवून व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली आहे. 
- अर्जुनतात्या बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, नाशिक

जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी (ता.२२) आयोजिण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत आंदोलकांनी व्यत्यय आणू नये यासाठी शरद जोशी शेतकरीप्रणित शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे व अन्य तीन ते चार कार्यकर्त्यांना एका द्राक्षाच्या मळ्यात निफाड पोलिसांनी सकाळीच नजरकैदेत ठेवले. 

बोराडे यांनी मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन रविवारी (ता.२१) शेतकऱ्यांना केले होते. लागलीच रविवारी बोराडे यांच्याकडे निफाड पोलिस दाखल झाले. सोमवारी (ता.२२) आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ, असे बोराडे यांना पोलिसांनी सूचित केले. त्यानुसार सोमवारी सकाळीच एक पोलिस कर्मचारी बोराडे यांच्या थेरगाव (जि. नाशिक) येथील निवासस्थानी दाखल झाला.

अर्जुनतात्या बोराडे व कार्यकर्ते संतू पाटील, केदू पाटील बोराडे, शंकर पुरकर यांना घेऊन संतू पाटील यांच्या द्राक्षाच्या मळ्यात पोलिस दाखल झाले. या मळ्यात या सर्वांना सभा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले; तसेच १२ ते १५ कार्यकर्त्यांना निफाड पोलिसांनी ताब्यात घेतले. सभेनंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, निषेध करण्याचा अधिकारही सरकारने हिसकावून घेतला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रकार हा लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधातला आहे, असे संघटनेचे पदाधिकारी  शशिकांत भदाणे, कडूअप्पा पाटील यांनी सांगितले.

`अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई`
निफाड तालुक्यातील थेरगाव येथील शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अनेक आंदोलनात श्री. बोराडे सहभागी असतात. त्यांच्याकडून किंवा संघटनेकडून आंदोलन करण्याबाबत पोलिस यंत्रणेला समजले असता त्यांना नजरकैदेत ठेवले. सभा संपल्यानंतर त्यांच्या घरून पोलिस कर्मचारी निघून आले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

 

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात नुकसानीचे ५४ हजार हेक्...सांगली : ‘‘जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
हवामाना आधारित फळपीकविम्याच्या निर्णयात...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब ही फळपिके...
`क्यार` चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील ६८...सिंधुदुर्ग  ः ‘क्यार’ चक्रीवादळाने...
नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे...नाशिक  : गेल्या पंधरा दिवसांपासून कसमादे...
तडे गेलेल्या द्राक्षांची खरेदी;...नाशिक : कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी द्राक्ष...
साताऱ्यातील छावणीचालक अनुदानाच्या...दहिवडी, जि. सातारा  : जुलै महिन्यापासून चारा...
वीज नियामक मंडळाचे नवीन धोरण सौरऊर्जा...पुणे  ः राज्यातील राजकीय अस्थिरतेचा फायदा...
पर्यायी सरकारसाठी काँग्रेस आघाडीत खलबतेमुंबई : अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद आणि समान...
पुणे जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य  पुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप...
नगरमधील आठ साखर कारखान्यांच्या... नगर : विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण...
सांगली : डाळिंब नुकसानीचा विमा किंवा...आटपाडी, जि. सांगली ः अतिपावसामुळे नुकसान झालेल्या...
तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा...
औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
द्राक्षबाग वाचविण्यासाठी मणिमंगळसूत्र...विटा, सांगली ः खानापूर तालुक्यात मॉन्सूनोत्तर...
नियंत्रण करडईवरील रोग, किडीचे...सतत पडणारा पाऊस, ढगाळ हवामान आणि हवेतील वाढलेले...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)हवामान अंदाज ः पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील....
सांगलीतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतसांगली : ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात कृष्णा...
कोल्हापूर जिल्ह्यात वाफशाअभावी रब्बी...कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून...
गडचिरोली जिल्ह्यात खरिपात केवळ ६० टक्‍...गडचिरोली  ः आदिवासी आणि नक्षलप्रवण असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात पंचनाम्याचे ८५ टक्के...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यात...