agriculture news in marathi, activities for farmers, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात 30 ला ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ उपक्रम
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

अकोला : शेतकऱ्यांच्या शेती तसेच पीककर्जाविषयी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावात ‘एक दिवस शेतकऱ्यासोबत’ या उपक्रमाचे शनिवारी (ता.३०) अायोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

अकोला : शेतकऱ्यांच्या शेती तसेच पीककर्जाविषयी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावात ‘एक दिवस शेतकऱ्यासोबत’ या उपक्रमाचे शनिवारी (ता.३०) अायोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

आपले सरकार, कृषी सेवा केंद्रांबाबतचे प्रश्न, कोणत्या वाणांची पेरणी करणार, कोणते बियाणे वापरणार, पिकांवर कोणत्या कीड -रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकताे, यासाठी असेलल्या उपाययोजना, पिकांवर फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याबाबतची माहिती तसेच परिवारातील सदस्य, लाभार्थी, कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे, पीककर्ज मिळाले का, पीककर्ज घेतल्यास त्याची परतफेड कशी करणार, तसेच शेतकऱ्यांना असलेल्या अडचणी, समस्या याबाबतची माहिती एक दिवस शेतकऱ्यांसोबत या उपक्रमामध्ये घेण्यात येणार आहे.

यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक, कृषी सेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा प्रशासनातील तहसीलदार, नायब तहसीलदार, बँक   कर्मचारी आदी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहेत. या उपक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...