शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड द्या : डॉ. इस्माईल

परभणी : ‘‘शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास नासाडी तसेच बदलत्या बाजारभावामुळे होणारे नुकसान कमी होईल,’’ असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी केले.
Add processing industry to agriculture: Dr. Ismail
Add processing industry to agriculture: Dr. Ismail

परभणी : ‘‘शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास नासाडी तसेच बदलत्या बाजारभावामुळे होणारे नुकसान कमी होईल. मुल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल. रोजगाराच्या संधी वाढतील,’’ असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन, प्रशिक्षण केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मुंबई येथील फार्म टू फोर्क सोल्युशन्स यांच्यातर्फे ‘हळद आणि सोयाबीन प्रकिया तंत्रज्ञान मुल्यवर्धन’ यावर गुरुवारी (ता.३) आणि शुक्रवारी (ता.४)  प्रशिक्षण देण्यात आले. उदघाटन कार्यक्रमात डॉ. ईस्माइल बोलत होते. कोरडवाहू संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. डब्ल्यु. एन. नारखेडे, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे मुख्‍य संशोधक डॉ. आनंद गोरे, महिला आर्थिक विकास महामंडळच्‍या जिल्हा समन्वयक अधिकारी निता अंभोरे, फार्म टु फोर्क सोल्युशन्सचे संचालक  उमेश कांबळे, अन्नतंत्र महाविद्यालयाच्र प्रा डॉ. राजेश क्षीरसागर, कृषीविद्या शाखा अभ्यासमंडळाचे सदस्य नरेश शिंदे, मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे आदी उपस्थित होते.

डॉ. इस्माईल म्हणाले, ‘‘हवामान बदल, कमी बाजारभाव, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, जमिनीचे आरोग्य, निविष्ठांच्या वाढलेल्या किंमती, विविध संसाधनासाठीची स्पर्धा, उत्पादनातील चढउतार, यामुळे शेतीतील जोखीम वाढली आहे. शेतकरी मेहनतीने अन्नधान्य उत्पादन घेतात. परंतु, काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाअभावी दरवर्षी २५ ते ३० टक्के शेतमालाची नासाडी होते.’’

डॉ. नारखेडे म्‍हणाले, ‘‘शेती क्षेत्रातील जोखीम कमी करण्यासाठी, महिला, युवकांना स्वावलंबी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगास मोठा वाव आहे. आपल्या भागात उत्पादित होणारा कच्चा शेतमाल लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योग हाती घेता येईल. लिंबू, आवळा अशा कोरडवाहू फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थांच्या माध्यमातून मुल्यवर्धन करावे. त्यातून आर्थिक विकास साधावा.’’

डॉ. क्षीरसागर म्‍हणाले, ‘‘हळद प्रक्रियेचे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्‍यक आहे. बचत गटांद्वारे हळद प्रक्रिया व मुल्यवर्धनास मोठा वाव आहे.’’ 

कांबळे म्हणाले, ‘‘मराठवाडा विभागातील डाळवर्गीय पिकांची प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग करुन विक्री करण्यास मोठ्या शहरात संधी आहे.’’

शिंदे यांनी हळदीचे मुल्यवर्धन, प्रक्रिया उद्योगासाठी शेतकरी गटांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गौरखेडे यांनी केले. डॉ. सुनील जावळे यांनी आभार मानले. वेबीनारमध्‍ये महिला शेतकरी, शेतकरी, तरुण शेतकरी सहभागी झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com