नांदेड परिमंडळाच्या तीन जिल्ह्यांत उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणार

नांदेड परिमंडळाच्या तीन जिल्ह्यांत उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणार
नांदेड परिमंडळाच्या तीन जिल्ह्यांत उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणार

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत उच्चदाब वीज वितरण (एचव्हीडीएस) प्रणालीची कामे प्रगतिपथावर आहेत. आजवर ६१९ शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामधे नांदेड जिल्ह्यातील १३२, परभणीतील २७०, हिंगोलीतील २१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

नागपूर येथील विधिमंडळाच्या २०१७ च्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनामत रक्कम भरून प्रलंबित वीज जोडण्या उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मार्च २०१८ अखेर राज्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येईल. त्यासाठी सरासरी २ लाख ५० हजार रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे.

अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येणाऱ्या ३३ हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येईल. उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्यासाठी ५ हजार ४८ कोटी रुपये खर्च होईल. प्रामुख्याने १० केव्हीए आणि १६ केव्हीएचे सुमारे १ लाख ३० हजार एवढे रोहित्र लागतील. काही तांत्रिक अडचणीमुळे या प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झाला. परंतु, आता या प्रणालीची कामे जोमाने सुरू आहेत.

महावितरण रोहित्रे देणार असून उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये ६०० एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह १०० टक्के कामे एजन्सींना देण्यात आली.  येत्या काही दिवसांत या प्रणालीतील कामांना मोठ्या प्रमाणात गती येईल. कामे निर्धारित वेळेनुसार मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार, अखंडित वीजपुरवठा मिळेल. १ किंवा २ शेतकऱ्यांसाठी  समर्पित रोहित्र राहील.

शेतकऱ्यांमध्ये रोहित्राप्रती स्वामित्वाची भावना राहील. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल. लघू, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी या योजनेतंर्गत सिंचनाची उद्दिष्टपूर्ती साधता येईल. रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होऊन तांत्रिक व वीजहानीचे प्रमाण कमी होईल, असेही सूंत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com