Agriculture News in Marathi Additional in Nagar district Let's find a way about it: Ajit Pawar | Agrowon

नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग काढू  ः अजित पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसप्रश्नी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यातून लवकरच मार्ग काढू, अशी ग्वाही पवार यांनी दिल्याचे दहातोंडे यांनी सांगितले. 

नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसप्रश्नी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यातून लवकरच मार्ग काढू, अशी ग्वाही पवार यांनी दिल्याचे दहातोंडे यांनी सांगितले. 

नगर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने कारखान्यांनी गाळप करण्याच्या अंदाजाने नोंदी घेतल्या आहेत. परंतू त्यापेक्षाही अतिरिक्त ऊस शिल्लक असणार असे दिसतेय. या बाबत शेतकऱ्यांना गाळप हंगाम संपत आल्यानंतर या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे संभाजी दहातोंडे यांनी अतिरिक्त उस प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यात साखर कारखाने फक्त नोंद असणारा ऊस गळितास घेऊन जात आहेत; परंतु बाकीचा नोंद नसलेला ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतो. परिसरातील १० ते ११ कारखाने या तालुक्यातून ऊस घेऊन जात आहेत; परंतु त्यांच्याकडून पेमेंट उशिरा मिळते. कधी कधी शेतकरी त्यांच्याकडे चकरा मारून वैतागून जातो. अशा प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होते. यावर मार्ग काढण्याची मागणी दहातोंडे यांनी केली. नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचा बिगरनोंदीच्या उसाचा प्रश्न यामुळे मिटणार आहे.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...