agriculture news in Marathi adequate water stock in Satara Maharashtra | Agrowon

साताऱ्यातील धरणात मुबलक पाणीसाठा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

जिल्ह्यातील प्रमुख धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने टंचाईच्या झळा कमी होणार आहे. कण्हेर धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणात ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सातारा: जिल्ह्यातील प्रमुख धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने टंचाईच्या झळा कमी होणार आहे. कण्हेर धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणात ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याच्या वीज निर्मितीची दृष्टीने महत्वाचे असलेल्या कोयना धरणात ४४.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनची हजेरी वेळेत झाल्यास झाल्यास यावर्षी धरणातील दरवाजे लवकर उघडावे लागलीत. यामुळे गतवर्षीप्रमाणे पूरस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वच धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. यामुळे शेकडो टीएमसी पाणी विनवापर नदी पात्रात सोडण्यात आले होते. दमदार पाऊस आणि पाण्याचा विसर्ग यामुळे जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले होते. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसानही सहन करावे लागले आहे. गतवर्षीचा मान्सूनचा मुक्काम वाढल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला नाही. तसेच शेतीला पाण्याची गरजही कमी झाली होती. यामुळे मे महिना सुरू झाला असलातरी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. 

राज्याच्या वीजनिर्मीतीच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या कोयना धरणात ४७.२० टीएमसी म्हणजेच ४४.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. यावर्षी मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यास या धरणातील पाण्याचा विसर्ग नेहमीपेक्षा अगोदर करावा लागणार आहे. यामुळे पुरस्थितीची भिती आहे. यामुळे शिल्लक पाणीसाठा व पावसाचे प्रमाण यावर कोटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. उरमोडी धरणातही ७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांना फायदेशीर ठरणार आहे. कोयनासह इतर प्रमुख धरणातही मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये धोम धरणात ४८.९५ टक्के, कण्हेर ३५.५३, धोम-बलकवडी ४४.०५, उरमोडी ७४.७७, तारळी ४५.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

प्रमुख धरणातील पाणीसाठा (टीएमसी) 
कोयना- ४७.२०, धोम ६.६१, कण्हेर ३.५९, धोम-बलकवडी १.८०, उरमोडी ७.४५, तारळी २.८६. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...