साताऱ्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा 

सध्या जिल्ह्यात तारळी धरणाचा अपवाद वगळता कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी या प्रमुख पाच धरणांत गतवर्षीच्या तुलनेत १८.६७ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे.
koyna dam
koyna dam

सातारा: सध्या जिल्ह्यात पावसाने दडी मारली असली तरी प्रमुख धरणांत समाधानकारक पाणीसाठा आहे. तारळी धरणाचा अपवाद वगळता कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी या प्रमुख पाच धरणांत गतवर्षीच्या तुलनेत १८.६७ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे.  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. तारळी धरणाचा अपवाद वगळता प्रमुख पाच धरणांत गतवर्षी याच कालावधीत ३४.६१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा ५३.२८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत १८.६७ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. कोयना धरणात गतवर्षी एकूण २४.२० टीएमसी; तर यंदा ३५.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ११.४१ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक होत आहे; तसेच धोम, धोम-बलकवडी व उरमोडी या धरणांत गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी शिल्लक आहे. त्याचबरोबर कण्हेरमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणी शिल्लक असून, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे.   धरणांमधील तुलनात्मक पाणीसाठा (टीएमसी)

धरण  २०२० २०१९
कोयना ३५.६१   २४.२०
धोम  ५.८१  २.७०
कण्हेर २.९३   २.७९
उरमोडी ५.५४  १.६८
तारळी  १.९९   २.२७
धोम-बलकवडी   १.४०   ०.९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com