agriculture news in Marathi Adinath Chavan says chemical residue free farming is future Maharashtra | Agrowon

रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य: आदिनाथ चव्हाण

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जागरूक झालेला ग्राहक रासायनिक अवशेषमुक्त शेती उत्पादनांची मागणी करू लागला आहे. त्यामुळे यापुढे रासायनिक अवशेषमुक्त शेतीलाच भवितव्य राहील, असे प्रतिपादन ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले.

नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जागरूक झालेला ग्राहक रासायनिक अवशेषमुक्त शेती उत्पादनांची मागणी करू लागला आहे. त्यामुळे यापुढे रासायनिक अवशेषमुक्त शेतीलाच भवितव्य राहील, असे प्रतिपादन ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले.

नाशिक येथे सुरू असलेल्या नवव्या जागतिक कृषी महोत्सवात शनिवारी (ता. २५) श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे, सतीश मोटे उपस्थित होते. या वेळी श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. चव्हाण यांना 'कृषी माउली' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेती या विषयावर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र सेंद्रिय माल उत्पादन ते विक्री व्यवस्थेबाबत शेतकऱ्यांना तोकडी माहिती दिली जाते. काळाची गरज ओळखून सविस्तर मार्गदर्शन गरजेचे आहे. जगभरात सेंद्रिय व रसायन अवशेषमुक्त शेतमालाची मागणी आहे. आज शेती व्यावसायिकदृष्ट्या होते आहे. त्यातून ग्राहक मिळविण्यासाठी रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनासाठी प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या सदैव मदतीसाठी ‘ॲग्रोवन'
आजचा शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीकडे वळत आहे. त्यामुळे ज्ञानाशिवाय प्रगती नाही. शेती क्षेत्रातील विविध प्रयोग, नवनवीन संकल्पना ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जात आहेत. या ज्ञानाचा शेतकऱ्यांनी जरूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. 


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...