agriculture news in Marathi adinath chavan says cumulative efforts must for Biodiversity consurvation Maharashtra | Agrowon

जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज ः अदिनाथ चव्हाण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने त्याचा ऱ्हास होऊन दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. पृथ्वीवरील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली आहे. याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसत आहे. म्हणून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन 'ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले. 

ग्रीनझोन ॲग्रो केम प्रा. लि. व पूर्वा केमटेक प्रा. लि. यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मधुक्रांती २०१९’ या तीन दिवसीय प्रदर्शन व परिसंवादाच्या उद्‌घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सकाळ -ॲग्रोवन या परिसंवादाचे माध्यम प्रायोजक आहेत.

नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने त्याचा ऱ्हास होऊन दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. पृथ्वीवरील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली आहे. याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसत आहे. म्हणून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन 'ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले. 

ग्रीनझोन ॲग्रो केम प्रा. लि. व पूर्वा केमटेक प्रा. लि. यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मधुक्रांती २०१९’ या तीन दिवसीय प्रदर्शन व परिसंवादाच्या उद्‌घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सकाळ -ॲग्रोवन या परिसंवादाचे माध्यम प्रायोजक आहेत.

या वेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, 'पूर्वा कृषिदूत'चे संपादक डॉ. बी. बी. पवार, सुप्रकृती मधूशाला नाशिकचे संचालक डॉ. तुकाराम निकम, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. जे. के. पुरकर, कृषी विद्या विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. व्ही. एस. पवार, कीटकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. बी. एस. शेवाळे, सीबीआरटीआय पुणेचे उपसंचालक एस. एम. पोकरे, उद्योजक आर. एस. बस्ते, बागपत (मध्यप्रदेश) येथील संजीव कुमार तोमर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. चव्हाण म्हणाले, की आगामी काळात शेतीसाठी पर्यावरणाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नाशिक जिल्ह्यात जागतिक दर्जाचे शेतीतील प्रयोग होत आहेत. यासाठी अनेकजण आपल्या प्रयोगशीलतेने काम करत आहेत. याच अर्थाने संजय पवार यांच्या संकल्पनेतून मधमाशी पालनाचे काम उभे राहिले आहे. त्यांनी स्वतः कृती करून मधमाशीपालनाबाबत जाणीव वृद्धिंगत केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

नीलिमा पवार म्हणाल्या, ‘‘या माध्यमातून मधमाशी पालन व्यवसायाचे दालन खुले झाले आहे. हा उपक्रम स्तुत्य असून यातून संधी निर्माण होतील.’’ 
कार्यक्रमाचे प्रास्तविक परिसंवादाचे निमंत्रक संजय पवार यांनी केले. ते म्हणाले, मधमाशी पालकांना संघटितपणे एकाच व्यासपीठावर आणून त्यांना प्रशिक्षित करण्यासह उत्पादन व मार्केटिंगसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मधमाशी पालन व्यवसाय केंद्रित काम उभे राहत असून या क्षेत्रात काम करणारे तरुण या व्यवसायाचे ब्रँड अँम्बेसेडर आहेत. 

राज्यात मधमाशीपालन आणि मधप्रक्रिया उद्योगात विशेष योगदान देणाऱ्या शेतकरी, संशोधक व उद्योजक अशा १२ जणांना ‘बसवंत मधुक्रांती पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. आभार परिसंवादाचे समन्वयक वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. भास्कर गायकवाड यांनी मानले. 

'ॲग्रोवन'च्या माध्यमातून रास्त भूमिका 
शेतीमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या विविध पध्दतींबद्दल अनेक गैरसमज व शंका असतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी शास्त्रज्ञ व अभ्यासकांनी पुढे येवून आपली भुमिका धीटपणे मांडली पाहिजे. या भुमिकेला 'ॲग्रोवन'मधून प्रसिध्दी दिली जाईल, असे ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केले. 


इतर अॅग्रो विशेष
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...