Agriculture news in marathi Adinath factory in Karmalya Ready to lease? | Agrowon

करमाळ्यातील आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची तयारी?

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची २०० एकर जमीन आणि कारखान्याच्या परिसरात लाखो मेट्रिक टन ऊस उपलब्ध असतानाही हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची २०० एकर जमीन आणि कारखान्याच्या परिसरात लाखो मेट्रिक टन ऊस उपलब्ध असतानाही हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आदिनाथ कारखाना तालुक्‍याची अस्मिता आहे. तालुक्‍याची अस्मिता भाड्याने देणे सभासद मान्य करतील का?  हा प्रश्न आहे. संचालक मंडळाच्या १८ जुनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव घेण्यात आला आहे.

 आदिनाथ साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कोणतीही बॅंक कारखान्यास कर्ज देण्यास तयार नाही. कारखान्याकडे राज्य सहकारी बॅंकेचे कर्ज थकीत आहे. याविषयी  १८ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कारखाना सक्षम व्यक्ती किंवा कंपनीस भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. 

कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश कांबळे यांच्या हिवरवाडी येथील निवासस्थानी संचालक मंडळाची ही बैठक घेण्यात आली. कारखान्यांचे अध्यक्ष धनंजय डोंगरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बागल गटाच्या नेत्या व आदिनाथच्या संचालिका रश्‍मी बागल, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, आदिनाथचे उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी अध्यक्ष संतोष पाटील, संचालक नानासाहेब लोकरे, डॉ. हरिदास केवारे, चंद्रहास निमगिरे, नितीन जगदाळे, बापुराव देशमुख, प्रकाश झिंजाडे, अविनाश वळेकर, अशिष गायकवाड, कार्यकारी संचालक अरूण बागनवर उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...