आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार

आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार
आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार

मुंबई : शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशी मागील काही दिवसांपासून चर्चा होती. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. मात्र, खुद्द आदित्य ठाकरे यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. 

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ३०) वरळीत शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यातच आदित्य ठाकरे यांनी स्वतः आपली उमेदवारी जाहीर केली. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटंबातील पहिली व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

दरम्यान शिवसेनेने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याआधीच रविवारी (ता. २९) एबी फॉर्मचे वाटप केले. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संबंधित उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. युती जाहीर होण्याआधीच शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे.

ज्या मतदारसंघाबाबत युतीत अगदी स्पष्टता आहे व पक्षांतर्गतही वाद नाही, अशा बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूरमध्ये आठ उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली. पिंपरी राखीव मतदारसंघातून आमदार गौतम चाबुकस्वार यांना, तर हिंगोलीतील कळमनुरीतून जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

दरम्यान, १८ जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे १३५-१३५ जागा लढवण्याचे सूत्र ठरल्याचे बोलले जात होते. शिवसेना आधीपासूनच ५०-५० जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. मात्र, भाजपकडून शिवसेनेला कमी जागांचा प्रस्ताव असल्याने फॉर्म्युला ठरण्यास वेळ लागत असल्याची शक्यता आहे.

शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागा लढवणार ः रत्नागिरी - उदय सामंत, गुहागर - भास्कर जाधव, दापोली - योगेश कदम, चिपळूण - सदानंद चव्हाण, राजापूर - राजन साळवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com