कर्जमुक्ती पूर्ण झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही ः आदित्य ठाकरे

संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही ः आदित्य ठाकरे
संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही ः आदित्य ठाकरे

चिखली, जि. बुलडाणा :  युतीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, ती पूर्णपणे झाली नसून बहुसंख्य शेतकरी यापासून वंचित आहे. पीकविम्याची स्थितीदेखील समाधानकारक नसून अर्धवट झालेली कर्जमुक्ती पूर्ण झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. जनतेला दिलेली वचने पाळण्याकरिता तसेच त्यांची पूर्तता करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असे प्रतिपादन युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले.   चिखली येथे झालेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. तिसऱ्या टप्प्यातील जनआशीर्वाद यात्रा जिल्ह्यातून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता ते बोलत होते. या वेळी ते पुढे म्हणाले, की महाराष्ट्रातील प्रत्येक गावासह शहरात, जनतेच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्याकरिता व त्याचे निराकरण करण्याकरिता तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्याकरिता मी महाराष्ट्रभर फिरत आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीत युतीला प्रचंड मताधिक्याने विजयी केले असून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. निवडणूक संपल्यानंतर इतर पक्ष जनतेत जातदेखील नाही. परंतु, शिवसेना हा पक्ष पूर्णपणे वेगळा असून जनसामान्यांकरिता नेहमीच तत्परत असतो. जात-पात, पंथ, भाषा यामध्ये न पडता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता, सर्वांना सोबत घेत त्यांचा आशीर्वाद मागायला आलो आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com