आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू

आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू
आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू

जळगाव ः शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा गुरुवारी (ता. १८) शहरातून सुरू झाली. या यात्रेनिमित्त ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीची भेट घेतली. 

सकाळी सुरवातीला जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुल परिसरातील गणपती मंदिरात ठाकरे यांच्याहस्ते महापूजा झाली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तीकर, संजय राऊत, माजी मंत्री सुरेश जैन, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील व जळगाव महानगर शिवसेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

ठाकरे यांच्या या यात्रेत मुंबई येथून महागड्या अशा २५ प्रवासी चारचाकींचा ताफाही होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अगदी शिस्तीने हा ताफा पुढे शिरसोली (ता. जळगाव) येथे पोचला. तेथे शेतकरी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. ही यात्रा पाचोरा (जि. जळगाव) येथे पोचली. तेथे लहान सभा घेण्यात आली. 

भडगाव, एरंडोल, पारोळा (जि. जळगाव) येथे यात्रेचे स्वागत झाले. या दरम्यान ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. धरणगाव येथे सभा झाली. धरणगाव येथून चोपडा येथे यात्रा पोचली. तेथेही मुख्य चौकात सभा झाली. ही सभा आटोपून यात्रा अमळनेरात पोचली. तेथेही स्वागत समारंभ झाल्यानंतर पुढे धुळे हा ताफा पोचला. शुक्रवारी (ता. १९) येथे सभाही ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com