agriculture news in Marathi, Aditya Thakareys says, demand for complete loan waiver, Maharashtra | Agrowon

सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही ः आदित्य ठाकरे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 जून 2019

सोलापूर ः दुष्काळाच्या प्रश्‍नावर कुणीही राजकारण करू नये, अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे, हे शिवसेनेचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना पहिल्यापासूनच आग्रही आहे, असे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

सोलापूर ः दुष्काळाच्या प्रश्‍नावर कुणीही राजकारण करू नये, अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे, हे शिवसेनेचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना पहिल्यापासूनच आग्रही आहे, असे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेचा प्रारंभ रविवारी (ता.९) सोलापुरात करण्यात आला. या वेळी आदित्य ठाकरे बोलत होते. या वेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार ओमराजे निंबाळकर, संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख महेश कोठे, पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, महिला संघटक अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.  

श्री. ठाकरे म्हणाले, की दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्याला सर्वांनी ताकदीने तोंड देणे आवश्यक आहे. मुळात दुष्काळात निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न हा कठीण आहे. सगळी मदत, सर्वोताेपरी साह्य आपण एकमेकांना करू शकू, पण पाण्याची निर्मिती आपण करू शकणार नाही. त्यामुळे या विषयावर विनाकरण कोणीही राजकारण करू नये. गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून मी स्वतः अनेक भागात दौरे केले. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरकारपातळीवरही त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. कर्जमाफी हा त्यापैकी एक विषय आहे. }

युतीच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने कर्जमाफीबद्दलचे धोरण स्पष्ट केले होते. सध्या जी कर्जमाफी झाली आहे, त्यातही काहीजण राहिले आहेत. त्यातील काही तांत्रिक बाबी सोडविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही होती आणि कायम राहणार आहे. या वेळी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्यांतील शेतकऱ्यांना द्यावयाच्या अन्नधान्य साहित्याचे पूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

सांगोला, भूमच्या छावण्यांमध्ये धान्यवाटप
सोलापुरातील या कार्यक्रमानंतर श्री. ठाकरे भूमला रवाना झाले. उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या एकवेळच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी हे अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सांगोला तालुक्यातील काही छावण्यांमध्ये या साहित्याचे वाटप केले. या वेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

इतर अॅग्रो विशेष
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...